सीएमव्हीच्या विळख्यात केळी बागा

17 हजार 500 हेक्टरक्षेत्रावर झाला प्रादुर्भाव
सीएमव्हीच्या विळख्यात केळी बागा

रावेर Raver।

सतत सुरु असलेल्या पावसाने आदर्ता (rain increased in intensity)वाढल्याने केळीच्या रोपांवर (banana plants) प्रचंड प्रमाणात सीएमव्हीचा विळखा (Diagnosis of CMV) पडत आहे.नव्याने जुलै व ऑगष्टमध्ये लागवड (newly planted) झालेल्या 17 हजार 500 हेक्टर क्षेत्रात (hectare area) 30 टक्क्यावर प्रादुर्भाव (Outbreak) झाला आहे.या बाधित क्षेत्रांची पाहणी (Inspection) भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण विभागाकडून (Department of Agriculture and Farmers Welfare) तसेच नाशिक केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या (Nashik Central Integrated Pest Management Centre) उच्चस्तरीय अधिकार्‍यांनी (officials) शनिवारी केली.

गेल्या आठवडाभरापासून सतत पाऊस सुरु आहे.यामुळे जनजीवन तर विस्कळीत झाले आहे,मात्र शेती कामांचा खोळंबा होऊन नवीन लागवड केलेल्या बागांवर सीएमव्हीने जबरदस्त विळखा घातला आहे.आता पर्यंत लाखो रोप उपटून फेकावी लागली असल्याने,शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.शनिवारी खा.रक्षा खडसे व आ.चंद्रकांत पाटील यांनी बांधावर जाऊन बाधित बागांची पाहणी केली तर आ.शिरीष चौधरी यांनी मुंबईत प्रधान सचीव एकनाथ डवले यांची भेट घेवून सीएमव्हीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी केली आहे.याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना पत्र लिहून,याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

दरम्यान शनिवारी भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण विभागाकडून तसेच नाशिक केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या अधिकार्‍यांनी रावेर तालुक्यातील बाधित क्षेत्राला भेटी दिल्या.

या टीममध्ये सहा.संचालक डॉ अतुल ठाकरे,सहा.वनस्पती संरक्षण अधिकारी विशाल काशीद,ऋषिकेश मानकर,उपविभागीय कृषी अधिकारी वैभव शिंदे,तंत्र अधिकारी दीपक ठाकूर,केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ जि पी देशमुख,तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे,पाल कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ महेश महाजन,तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत माळी,अभिनव माळी यांचा समावेश होता. रोझोदा,वाघोदा,मस्कावद,तांदलवाडी,सुनोदा,आंदलवाडी,केर्‍हाळे,नेह्ता,लूमखेडा येथील बाधित क्षेत्रात जाऊन पाहणी केली. संबधित अधिकार्‍यांनी जुलै-ऑगस्ट मध्ये लागवड केलेल्या बागांवर सीएमव्हीचा विळखा असून,आगामी काळात जुलै-ऑगष्टमध्ये लागवडी करून नये व नत्राचा अधिक वापर करून नये,कृषी विभागाने शिफारशीनुसार खत व्यवस्थापन करावे असे मार्गदर्शन केले आहे.

23 हजारांपैकी 11 हजार रोप काढून फेकली

नेह्ता येथील नत्थू पाटील या शेतकर्यांनी नव्याने लागवड केलेल्या सुमारे 23 हजार रोपांमधील 11 हजार रोप उपटून फेकले आहे.तर केर्‍हाळे येथील चंद्क्रांत अशोक पाटील व संजय पाटील यांचे देखील सीएमव्हीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे.केळी रोप देणार्‍या कंपनीकडून सीएमव्ही रोग रोपांवर आक्रमण करणार नाही,यासाठी विशेष उपाय योजना करून रोप निर्माण करून वितरीत केले तर एवढ्या मोठ्या नुकसानापासून शेतकरी वाचतील असा सूर केळी उत्पादक काढत आहे.

केळी रोप देणार्‍या जिल्ह्यातील कंपनीची मोनोपॉली असून,त्यांच्याविरुद्ध काही बोलले तर ब्लॅॅकलिस्टमध्ये टाकून पुढे रोप दिले जात नाही,तोंड दाबून बुक्यांचा मार दिला जात असल्याचा रोष वाघोडा येथील शेतकरी किशोर पाटील यांनी आमदार चंद्रकात पाटील केळी बागांची पाहणी करतांना पत्रकारांसमोर व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com