दोन दिवसात मिळणार केळी विम्याची भरपाई

सात महसूल मंडळातील केळी उत्पादक मंडळीना दिलासा
दोन दिवसात मिळणार केळी विम्याची भरपाई

रावेर - Raver

२०१९ -२० मध्ये केळी विमा घेतलेल्या केळी शेतकऱ्यांना आता विमा भरपाई मिळण्याची प्रतीक्षा आता संपली असून तालुक्यातील सात महसूल मंडळातील केळी पिक विमा घेतेलेल्या शेतकऱ्यांना येत्या तीन-चार दिवसात केळी पिक विम्याची भरपाई मिळणार आहे.

यासाठी सबंधित बँकेच्या मुख्य शाखांमध्ये रक्कमा येवून पडल्याची विश्वसनीय माहिती बँकेच्या अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रक्कमा जमा होणार आहे.

यंदा अति उष्ण तापमान व थंडी या दोन्ही निकषात सात महसूल मंडळे पात्र ठरली आहे. मात्र खानापूर वगळता सहा महसूल मंडळ रावेर, सावदा, निंभोरा, खिर्डी, ऐनपूर, खिरोदा या मंडळातील केळी विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ६३ हजार व खानापूर मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.

वादळाने नुकसान झालेली भरपाई पुढील एका महिन्यात प्राप्त होणार असल्याचे देखील विश्वसनीय वृत्त आहे. केळी पिक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी गेल्या महिनाभरापासून वाट पाहत होते.

यंदा शेती उत्पादनांना मोठा फटका बसल्याने विम्याच्या रक्म्माबाबत शेतकरी आवसून बसले होते. मात्र आता प्रतीक्षा संपली असून पुढील दोन तीन दिवसात किंवा सोमवार पर्यंत विम्याची रक्क्क्म शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली असेल अशी माहिती बँकेच्या बड्या अधिकाऱ्याकडून मिळाली असून, कृषी अधिकारी भामरे यांनी देखील यास दुजोरा दिला आहे.

२०२० पासून पुढील तीन वर्षासाठी निकष तेच राहणार का शेतकरी चिंतेत ?

यंदापासून केळी पिक विम्याचे निकष बदलवण्यात आले, या निकषाने नुकसान होवूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकणार नाही. कारण यासाठी ज्या नुकसानीच्या मर्यादा आहेत त्या खूप जास्त दिवसांच्या आहेत. सलग सात दिवस थंडी व सात दिवस उष्ण तापमान हे निकष निर्धारित केले आहे.हि बाब नुकसान होवूनही भरपाई पासून वंचित ठेवणारी आहे. ३० ओक्टोबर केळी पिक विमा घेण्याची शेवटची मुदत आहे. मात्र अजूनही याबाबत राज्य व केंद्र सरकार कडून हालचाली नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हतबलतेने निकष बदलण्याची वाट पाहत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com