
जळगाव । Jalgaon
आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत मिलिंद लोणारी आरोग्य सेवक (प्रभारी) प्रसिद्धी माध्यम अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सोमवारी दि.23 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता मुंबई येथील रंगशारदा सभागृह होणार्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिलिंद लोणारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार प्राप्त मिलिंद मनोहर लोणारी यांची प्रथम नियुक्ती नंदुरबार जिल्ह्यात झाली त्यांनी आदिवासी भाग नवापूर, धडगाव, अक्कलकुवा, तसेच दळणवळणाची साधने नसलेली नर्मदा परिसर अंतर्गत नर्मदा किनारी डोंगराळ अति दुर्गम भागात येणार्या गावांना आरोग्य सेवा बजावलेली आहे,.
सदर ठिकाणी आरोग्य विभाग अंतर्गत येणार्या विविध योजना राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत कुटुंब नियोजन शासकीयकरिता लाभार्थींचे मतपरिवर्तन आणि गर्भनिरोधक साधनांचा वापर इत्यादीबाबत आरोग्य शिक्षण समुपदेशन करणे, राष्ट्रीय हिवताप-हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग नियंत्रण, अंधत्व नियंत्रण, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल कार्यक्रम, डेंग्यू चिकनगुनिया, माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत खेडोपाडी नियमित लसीकरण कार्यक्रम रबाविणे, पल्स पोलिओ कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, साथरोग कार्यक्रम इ. आरोग्य सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उपकेंद्रस्तरावर दिली आहे. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषद येथे बदली झाल्यानंतर आरोग्य विभागात उत्कृष्ट कामकाज केले आहे.