जळगाव । प्रतिनिधी jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) हे (Central Government) केंद्र सरकारच्या महात्मा गांधी (Mahatma Gandhi) राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेच्या या वर्षीच्या जिल्हा ग्रीन (हरित) चॅम्पियन पुरस्काराचे (Green Champion Award) मानकरी ठरले आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ.डब्ल्यु जी प्रसन्नकुमार यांनी ई-मेलद्वारे विद्यापीठाला ही माहिती कळवली आहे.
भारत सरकाराच्या (Government of India) उच्च शिक्षण परिषदे मार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच हा पुरस्कार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी जिल्हास्तरापासून ते केंद्रीयस्तरापर्यंत विविध शैक्षणिक संस्थांच्या परिसराची स्वच्छता, हरितपणा या सोबतच पाणी, ऊर्जा व्यवस्थापन, जमीनवापर व्यवस्थापन आदी निकषाद्वारे मुल्यमापन केले जाते.
विद्यापीठाने स्वच्छता, ऊर्जा आणि हरित व्यवस्थापन या क्षेत्रात सर्वोत्तम पध्दतीचा यशस्वीपणे अवलंब करून आमलात आणला आहे ज्यामुळे विद्यापीठाचा परिसर अत्यंत सुंदर व देखणा झाला आहे.
विद्यापीठ कर्मचारी निवास्थान तसेच मुलींचे काही वसतिगृह या ठिकाणी पाणी जिरवून हार्वेस्टींग केले आहे. काही विभागांमध्ये सौर पॅनल लावले आहेत तर एलईडीचा वापर करून विजेची बचतही केली आहे.
विद्यापीठाच्या 600 एकर पेक्षा अधिक असलेल्या परिसरात लाखो झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळेच विद्यापीठाला हा पुरस्कार जाहीर झाल्याचे प्रभारी कुलसचिव प्रा.रा.ल.शिंदे यांनी सांगितले. विद्यापीठाचा बांधकाम, उद्यान ,पाणीपुरवठा विभाग यांचे या मध्ये लक्षणीय योगदान आहे.