आदिवासी महिलांशी संवाद करतांना ऑस्ट्रेलिया येथील पाहुणे
आदिवासी महिलांशी संवाद करतांना ऑस्ट्रेलिया येथील पाहुणे

ऑस्ट्रेलियन पर्यटकांना आदिवासी संस्कृतीची भुरळ

४० वर्षांपासून दरवर्षी येतात ऑस्ट्रेलियन पाहुणे

पाल ता.रावेर - वार्ताहर raver

ऑस्ट्रेलिया (Australia) येथील पर्यटक (tourists) पाल (ता.रावेर) (raver) येथे दाखल झाले असून ६ दिवस ते या भागातील संस्कृती व आदिवासी नागरिकांची जीवन पद्धती जाणून घेणार आहे.गेल्या ४० वर्षांपासून ऑस्ट्रेलियन पर्यटकांना लळा लागला आहे. करोना (corona) काळात आलेल्या संकटांनंतर जनजीवन सुरळीत झाल्याने,पर्यटक आता भारतात दाखल होत आहे.

आदिवासी महिलांशी संवाद करतांना ऑस्ट्रेलिया येथील पाहुणे
धक्कादायक ; मुलाच्या हत्येची आईनेच दिली सुपारी

पाल येथे आलेल्या पाहुण्यांचे अस्सल आदिवासी संस्कृतीप्रमाणे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह सातपुडा मंडळाचे सचिव अजित पाटील व अशोक झांबरे, सुधाकर झोपे, शरद वाणी, प्रविण चौधरी, गारखेडा सरपंच रतन बारेला, संजय पवार, उत्तम चव्हाण, हरी चव्हाण, हैदा राठोड, शेवा चव्हाण, करणसिंग पवार, श्रावण पवार व गुलाबवाडी येथील कालिदास चव्हाण स्वागतासाठी सज्ज होते.

त्यांना बंजारा भाषेतील फागगीत व लेगीनृत्य व बंजारा संस्कृतीची व परंपरेची माहिती देण्यात आली. ऑस्ट्रेलियन विद्यार्थीनी नी आदिवासी महिलांचा पेहराव व दागिने परिधान करून संस्कृतीची प्रशंसा केली. प्रशिक्षक नोबेल जेसन, स्टुअर्ट, लुक , मीना, आर्यन, सॅम, जय, हॅरी, लिटल, स्विनि, मेगन, मधु हे पाहुणे सध्या सातपुड्याच्या कुशीत पाहुणचाराचा आस्वाद घेत आहे.

आदिवासी महिलांशी संवाद करतांना ऑस्ट्रेलिया येथील पाहुणे
धक्कादायक ; मुलाच्या हत्येची आईनेच दिली सुपारी

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com