औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला बकालेचा अटकपुर्व जामीन

समाजाच्या वतीने उभी राहिली वकीलांची फौज
 किरणकुमार बकाले
किरणकुमार बकाले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मराठा समाजाविषयी (Maratha community) आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) करणारे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले (Suspended Police Inspector Kiran Kumar Bakale) यांचा अटकपुर्व जामीन (Anticipatory bail) मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad High Court) शुक्रवारी फेटाळून (Rejected) लावला. त्यामुळे आता बकालेच्या अटकेचा मार्ग (Clear the way for arrest) मोकळा झाला आहे. समाच्याकडून बकालेविरोधात सुमारे 47 वकिलांची फौज उभी राहीली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन यांच्याशी मोबाईलवरुन संभाषण करतांना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी बकलेंच्या निलंबणाचे आदेश काढले होते. त्यानंतर लागलीच दुसर्‍या दिवशी जिल्हापेठ पोलिसात समाजाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. विनयभंग, पोलीस अप्रितीची भावना चेतावणी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम वाढविण्यात आले.

जिल्हा न्यायालयाने बकलाचे अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांचे चार पथके वेगवेगळ्या ठिकाणी जावून आली. मात्र पथकाला बकाले मिळाले नाहीत. दरम्यान, बकाले यांनी अटकपुर्वसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आता उच्च न्यायालयाने देखील बकालेचा अटकपुर्व जामीन फेटाळून लावल्याने त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दलात रुजू होतांनाची शपथ घेतली रेकॉर्डवर

औरंगाबाद खंडपीठात सुनावनीला सुरुवात झाल्यानंतर तपासाधिकारी उपअधीक्षक संदीप गावीत हे देखील न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने पोलीस दलात रुजू होताना काय शपथ घेतली जाते, अशी विचारणा गावीत यांना करुन न्यायालयाने ही शपथ रेकॉर्डवर घेतली. सरकारपक्षाच्यावीने अ‍ॅड.डी.आर. काळे, मराठा समाजाच्यावतीने अ‍ॅड.मयुर साळुंखे, अ‍ॅड.अभयसिंह भोसले यांनी युक्तीवाद केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com