शिक्षण उपसंचालकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिक्षण उपसंचालकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

शालार्थची फाईल मंजुरीला विलंब करत वेगवेगळ्या कारणांनी त्रास

भुसावळ (प्रतिनिधी) (Bhusawal) -

शालार्थच्या फाईलवर (School file) चार महिने उलटूनही शिक्षण उपसंचालक (Deputy Director of Education) स्वाक्षरी करुन मंजुरी (Approval) देत नाहीये. या शालार्थची फाईल प्रलंबित असल्यामुळे काम करुनही संस्थेकडून त्याचा मोबादला मिळत नाहीये. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही शिक्षण उपसंचालकांकडून फाईल मंजुर न करता त्रास दिला जात असल्याने या छळाला कंटाळून जामनेर (Jamner) तालुक्यातील एकलव्य (Eklavya) विद्यालयात नोकरी असलेल्या भारत बाबुलाल रेशवाल (रा. वरणगाव रोड, भुसावळ) शिक्षकाने (Teacher) विषारी (Position) पदार्थ खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच प्रकार लक्षात आल्याने कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शिक्षण उपसंचालकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

दरम्यान कागदपत्रांची पूर्तता करुनही शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याच्यांकडून रेशवाल यांची फाईल कोणत्या कारणाने अडविण्यात आली आहे, या मागे नेमका त्यांचा उद्देश काय, शिक्षकाचा जीव गेल्यावर उपसंचालक फाईलवर स्वाक्षरी करतील काय असाही प्रश्‍नही आता उपस्थित होत आहेत.

दरम्यान, घटनेबाबत बाजारपेठ पोलिसांत (Bajar Peth Police) माहिती देण्यात आली आहे. भारत रेशवाल (Bharat Richawal) यांची पत्नी अंकिता रेशवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जामनेर येथील एकलव्य शिक्षण संस्था व संस्थेत कार्यरत शिक्षक भारत बाबुलाल रेशवाल यांच्या वाद होता. त्यामुळे रेशवाल यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. तब्बल सात वर्ष कायदेशीर लढा दिल्यानंतर रेशवाल यांना न्याय मिळाला. उच्च न्यायालयाने रेशवाल यांना शाळेत पुन्हा रुजू करुन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२० रोजी भारत रेशवाल पुन्हा शिक्षक म्हणून एकलव्य शिक्षण संस्थेत रुजू झाले. रूजू झाल्यानंतर शालार्थ संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करत रेशवाल यांनी स्वतः प्रस्ताव शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी (NITIN UPASNI)यांच्याकडे जमा केला.

तब्बल चार महिन्यांपासूनच फाईल पडून

तब्बल चार महिन्यांपासून ही फाईल शिक्षण उपसंचालक उपासनी यांच्याकडे पडून आहे. इतर फाईलवर उपासनी यांनी मंजूरी दिली मात्र रेशवाल यांच्या फाईल अडकवून ठेवली आहे. फाईल प्रलंबित असल्याने रेशवाल यांना नोव्हेंबरपासून संस्थेकडून वेतनापोटीचा एक रुपयाही मिळालेला नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यात रेशवाल यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन शिक्षण उपसंचालक उपासनी यांच्याकडून त्रास दिला जात असून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासाठी उपासनी यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप अंकिता रेशवाल यांनी केला आहे.

संस्थेकडून सहा महिन्यांपासून पगार होत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा जबाब भारत रिचवाल यांनी बाजारपेठ पोलिसांना दिला असल्याचे सुत्रांनी सांगितले. याबाबत बाजारपेठचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे (Pratap Ingale) यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याकडे माहिती नसल्याचे सांगून माहिती घेतो असे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत बाजारपेठ पोलिसात अद्याप कुठलाच गुन्हा दाखल नसल्याचे समजते.

संस्था आणि शिक्षकांचा वाद आहे. बॅकडेटच्या डिफरन्सचा विषय आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षक भारत रीचवाल यांनी आपल्याकडे दिला आहे. याबाबतच्या सुनावणीत संस्था व शिक्षक समोरासमोर हजर राहिल्यास फाईलवर निर्णय घेता येईल.
-नितीन उपासनी शिक्षण उपसंचालक, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com