
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
खूनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात (district jail) बंदी (prisoner) असलेल्या बंदीने कारागृहाती बॅरेकमधील खिडकीला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केलयाची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या बंदीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कारागृहातील (prison) पोलीस शिपाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते दि. 12 फेब्रुवारी ते कारागृहात नाईट ड्युटीला होते. जिल्हा कारागृहात जळगाव तालुक्यातील खेडी बु येथील अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे (Karthik Nana Sonawane)याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात खूनाचा (murder) गुन्हा दाखल असून तो या गुन्ह्यात संशयीत आरोपी (Accused) असल्याने तो गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हाकारागृहात बंदी आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी अमोल उर्फ कार्तिक याने बॅरेक क्रमांक 3 मध्ये खिडकीच्यावर असलेल्या वॅन्टीलेटरच्या लहान खिडकीच्या लोखंडी गजाला टॉवेलची दोरी तयार करुन गळफास घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या बॅरेकमधील इतर बंदी प्रशांत संजय चौधरी यांनी अमोल याचे पाय धरुन ठेवले होते.
आरडाओरड केल्याने घटना उघडकीस
अमोल उर्फ कार्तिक सोनवणे या बंदीने कारागृहातच आत्महत्या (suicide) केल्याचा प्रयत्न केल्याने त्याच बॅरेकमधील इतर बंदीनी आरडाओरड केली. त्यांची आरडाओरड ऐकूण पोलील शिपाई राजू ढोबाळ यांनी तात्काळ बॅरेककडे धाव घेतली. यावेळी अमोल याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
बंद्यांच्या मदतीने उतरविले खाली
बंदी अमोल याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजताच त्याच बॅरेकमधील बंदी नदीम शहा, गजानन राठोड, धिरज शिंदे, राजेंद्र सावकारे या बंदीसह जेलचे शिपाई राजू ढोबाळ (Peon Raju Dhobal) यांनी त्यांना तात्काळ खाली उतरविले असता त्याच्या गळ्यावर गळफास घेतल्याचे वण्र होते.