बेराेजगारीमुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नागरिकांनी वाचविले प्राण, क्षणाचाही विलंब झाला असता, तर घडली असती दुर्घटना
बेराेजगारीमुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव - Jalgaon

शहरातील मेहरुण (Mehrun) परिसरातील भिलाटी या भागात राहणार्‍या एका २९ वर्षीय तरुणाने हाताला काम नसल्याने जळगाव शहरातील मेहरुण तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला. तलावात उडी घेतल्यानंतर प्रकार लक्षात आल्याने या ठिकाणाहून जाणार्‍या राहूल बाळू इंगळे या अभियंत्या तरुणाने इतरांच्या मदतीने तलावात बुडणार्‍या तरुणाला वाचवून जीवनदान दिले आहे.

बेराेजगारीमुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

तरुणाने मेहरुण तलावाच्या मागील बाजूने तलावात उडी घेतली. प्रत्यक्षदर्शी राहूल इंगळे यांना व सोबत असलेल्या विपूल मोरे या दोघांना पोहता येत नसल्याने त्यांनी आरडाओरड करत या परिसरातील पशुपालक तसेच खाद्य पदार्थ विक्री करणार्‍या नागरिकांना बोलाविले. पशूपालक पाण्यात उतरले व त्यांनी तलावात आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला बाहेर काढले. क्षणाचाही विलंब झाला असता तरुणाचा बुडून मृत्यू झाला असता, मात्र राहूल इंगळे हे देवदूताच्या रुपाने तरुणाच्या मदतीसाठी धावले. त्यामुळे तो बचावला. या कामगिरीबद्दल राहूल इंगळे यांच्यासह तरुणाला वाचविणार्‍या नागरिकांचे कौतुक करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com