शस्त्रांसह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश

चौघांसह दोन अल्पवयीन मुलांना अटक
शस्त्रांसह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गावठी पिस्तूल, धारदार चाकू सोबत घेवून रस्त्यावरुन जाणार्‍या वाहनावर दरोडा (Vehicle robbery) टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीच्या (gang) शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एस.टी. वर्कशॉपजवळून एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) मुसक्या आवळल्या. (arrested) त्यांच्याकडून हत्यारे जप्त करण्यात आले असून या टोळीतील दोन मुले अल्पवयीन असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शस्त्रांसह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश
Big Breaking # 2000 रूपयांच्या नोटेबाबत आरबीआयने घेतला मोठा निर्णय... वाचाच अन्यथा होऊ शकते नुकसान
शस्त्रांसह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश
रेल्वे प्रवाशांनो हुतात्मा एक्सप्रेसने प्रवासाचे नियोजन करू नका... कारण..

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गुरुवारी रात्रीच्या सुमारास आपल्या हद्दीत नाईट पेट्रोलिंग ड्युटी करीत असतांना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी त्यांनी काशिनाथ चौकात बोलाविले. याठिकाणी जावून त्यांनी सांगितले की, एसटी वर्कशॉपजवळ अंधारात काही जण शस्त्रात्रे घेवून रस्ता लुट किंवा दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले. त्यानुसार पोहेकॉ प्रदिप पाटील, पोना हेमंत कळसकर, पोकॉ अशफाक मेहमुद शेख, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एसटी वर्कशॉप परिसरात जावून सापळा रचला. याठिकाणी तीन इसम मोटार सायकली जावून अंधारात लपलेले होते तर इतर त्यांचे तीन साथीदार रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला उभे होते.

शस्त्रांसह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश
जळगावचा पाणीपुरवठा नियोजित वेळेवरच होणार
शस्त्रांसह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश
VISUAL STORY : गळ्यात नको ते घालून उर्वशी रौतेलाने केला कहर

दरोड्याच्या साहित्यासह हत्यारे जप्त

छापा टाकून संशयितरित्या फिरत असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करीत त्यांची अंगझडती घेतली. यामध्ये स्वप्निल उर्फ गोल्या याच्या कमरेला गावठी पिस्टलसह तीन जिवंत काडतूस, निशांत चौधरीकडून धादार चाकू, यश शंकपाळकडे लोखंडी टॉमी, पंकज चतुरकडे मिरची पावडर तर दोन अल्पवयीन मुलांकडे बटनाचा व वायर गुंडाळलेले धारदार पाते असे हत्यार मिळून आले. पोलिसांनी हत्यांरासह (एमएच 19 आर 9309) क्रमांकाची दुचाकी असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

शस्त्रांसह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश
दोन दिवसात फुकट्या प्रवाशांकडून दोन लाख 98 हजारांचा दंड वसुल
शस्त्रांसह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश
वरणगाव फॅक्टरीत वाढत्या तापमानामुळे भीषण आग

टोळीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

स्वप्निल उर्फ गोल्या धर्मराज ठाकूर (वय-19), निशांत प्रताप चौधरी (वय-19, दोघ रा. शंकरराव नगर), पंकज चतुर राठोड (वय-19, तुकारामवाडी), यश देविदास शंकपाळ (वय-19, रा. हरिओमनगर, असोदा रोड) यांच्यासह ोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि आनंदसिंग पाटील व योगेश बारी हे करीत आहे.

शस्त्रांसह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश
शहरात आर. आर. आर. सेंटर स्थापन करणार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com