अजिंठालेणीचे व्हिजीटर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

अजिंठालेणीचे व्हिजीटर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

सोयगाव, Soygaon,

अजिंठालेणी ( Ajantha leni) निसर्गसौंदर्याने नटलेली अतिशय सुंदर साईट आहे.येथे प्रत्येक पाऊलावर इतिहास आहे.प्रत्येक व्यक्तीने व अभ्यासकाने बघावे असे हे ठिकाण आहे या ठिकाणी पर्यटनाच्या (Tourism) दृष्टीने आणखीही काही विकासात्मक (Developmental) कामे केली जावू शकतात व मागील चार वर्षापासून बंद असलेले व्हिजीटर सेंटर (Visitor Center:) पर्यटकांसाठी पुन्हा सुरु (reopen) करणे बाबत मी नकीच विचार करेल असे प्रतिपादन पर्यटनमंत्री (Tourism Minister) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवार (दि.27)रोजी अजिंठालेणी व्हिजीटर सेंटर व त्यानंतर जगप्रसिद्ध अजिंठालेणीला भेट दिली.यावेळी त्यांच्या सोबत ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार माजी खा.चंद्रकांत खैरे आ.अंबादास दानवे शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण पोलिस अधीक्षक निमित गोयल आदींची उपस्थिती होती.

प्रोटोकॉल नुसार गुरुवारी सकाळी 10:15 वाजता अजिंठालेणी व्हिजीटर सेंटर येथे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे भेट देणार होते.मात्र उशीराने संध्याकाळी 5:30 वाजता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे अजिंठालेणी व्हिजीटर सेंटर येथे आगमन झाले. त्यामुळे सकाळी 9 वाजेपासून अजिंठालेणी टि.पॉइंट येथे पर्यटन मंत्र्याच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्ते व अधिकाऱ्यांना सुमारे सात तास पर्यटनमंत्र्याच्या प्रतीक्षेत ताटकळत काढावे लागले.

व्हिजीटर सेंटर मध्ये पर्यटनमंत्र्यानी लेणी क्रमांक 2 चे अवलोकन करुन संध्याकाळी 6 वाजता जगप्रसिद्ध अजिंठालेणी कडे प्रयाण केले.दरम्यान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जगप्रसिद्ध अजिंठालेणीचे सुमारे दोन तास अवलोकन करुन गाईड सय्यद अबरार व भारतीय पुरातत्व विभागाचे वरिष्ठ संवर्धन साहाय्यक डि.एस दानवे यांच्या कडून अजिंठालेणीतील लेणी क्रमांक 1 ,2 ,4 ,6 9,10,19 व 26 मधील चित्रशैली व शिल्पकले बाबत माहिती जाणून घेतली.जागतिक वारसा असलेल्या अजिंठालेणी व येथील आदरातिथ्य बघून आपण भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया अजिंठालेणी बघितल्या नंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com