खंडाळा तलावाच्या बुडीत क्षेत्रातील जमीन लाटण्याचा प्रयत्न

अवैध उत्खनन करून मुरूमाचा टाकला बांध : पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष
खंडाळा तलावाच्या बुडीत क्षेत्रातील जमीन लाटण्याचा प्रयत्न

खंडाळा,(Khandala) ता. भुसावळ वार्ताहर

येथील तलावाच्या बुडीत क्षेत्रात कृषी विभागातील (Agriculture diperment) सेवानिवृत्त कर्मचार्‍यांने (Retired Eyempoly) शेतीच्या नावाखाली चक्क तीन एकर जमीन तयार करून घेतली असून लाखो टन अवैध रीतीने उत्खनन करून मुरूमाचा भलामोठा चार फूट उंचीची बंधारा टाकून घेतला असून खाली तीन फूट खोल चारी खोदून घेतली आहे. याकडे संबंधित पाटबंधारे विभागाचे ( PWD Diperment) व महसूल विभागाने (Revanue Dipermwnt) काना डोळा केला असून भविष्यात गावकर्‍यांना पाण्यासाठी भटकंती (Water Shorted) करावी लागण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍याने जवळपास तीन एकर जमीन लाटली आहे. ही जमीन तलावाच्या बुडीत क्षेत्रातील असून तीन एकरमध्ये तलावाच्या पाण्याचासाठोबा कमी झाला असून तलावाच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. यामुळे गावात व शेतकर्‍यांना पाणी मिळत नाही. याबाबत सेवानिवृत्त कर्मचार्‍याला गावकर्‍यांनी विचारणी केला असता ’तुम्हाला जे करायचे आहे ते करा, माझे वरपर्यंत पोहच आहे मी पूर्ण तलाव पण तयार करून पेरून घेईल जे करायचे आहे ते करा’ असे उडवाउडवीची उत्तर देत असून संबंधित पाटबंधारे विभागाने ही तीन एकर जमीन लाटण्यार्‍या सेवानिवृत्त कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांवर योग्य ती कार्यवाही करून ती जमीन जशी होती तशी सपाट करून द्यावी व पाटबंधारे विभागाच्या हद्दीत परत घ्यावी व या तीन एकर जमीन लाटण्यार्‍यावर महसूल विभागाने अवैध रित्या मुरूम चोरी केल्या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी गावकरी करीत आहे.

योग्य ती कार्यवाही करणार
खंडाळा तलावाच्या बुडीत क्षेत्रात ज्यांनी अतिक्रमण किंवा तलावाची जमीन लाटण्याचा प्रयत्न करीत असेल त्यांच्यावर पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे पाटबंधारे सिंचन विभाग (Irrigation Department) शाखा अभियंता पी.एम.पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.