खडसेंकडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न- प्रदीप पवार

Breaking news
Breaking news Breaking news

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (District Bank Elections)काँग्रेस पक्षाच्या (Congress party directors) तीनही संचालकांनी महाविकास आघाडीच्याच (Mahavikas Aghadi candidate) उमेदवाराला मतदान केले. आम्ही कुठलीही गद्दारी केली नाही. स्वत:ची प्रतिष्ठा झाकण्यासाठीच राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे (NCP leader MLA Eknathrao Khadse) हे काँग्रेसचे नाव घेऊन बदनाम (infamous) करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा पलटवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आणि आमदार शिरीष चौधरी यांनी केला.

Breaking news
Breaking # भाजपा-शिंदे गटाच्या साथीने पवारांनीच उलथविली राष्ट्रवादीची सत्ता

जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या संचालकांनी महाविकास आघाडीशी गद्दारी केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केला. काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेऊन त्यास प्रत्युत्तर देण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले की, आमचे केवळ तीनच संचालक होते. जिल्हा बँकेत सत्तेचे जे सूत्र ठरले आहे त्याचप्रमाणे व्हावे अशी आमची इच्छा होती. मात्र असे असतांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला विश्वासात न घेता केवळ संचालकांना बैठकीला बोलावले होते. त्यामुळे आम्ही आमच्या तीनही संचालकांना काँग्रेस भवनात बोलावून घेतले होते. त्यानंतर आ. खडसेंचा आम्हाला फोन आला आणि आम्ही जिल्हा बँकेत गेलो. त्याठिकाणी शेवटचे दोन वर्ष काँग्रेसचा उपाध्यक्ष करण्यावर सहमती झाली. तसेच राष्ट्रवादीने चेअरमनपदासाठी अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचे नाव निश्चीत केल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीतच इच्छुकांची संख्या वाढल्याने नेमके कोण फुटले? याचे आत्मपरिक्षण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले पाहिजे असा टोलाही पवार यांनी आ. खडसेंना लगावला.

असले आरोप खडसेंना शोभत नाही - आ. चौधरी

आघाडीत राहुन घटक पक्षाची बदनामी होणारे आरोप करणे हे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नसल्याचा टोला काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी लगावला. तसेच खडसेंना यापुढे आघाडी टीकवायची नाही असेच यावरून दिसत असल्याचेही आ. चौधरी यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेस जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील, शैलजा निकम, गोंडू महाजन, प्रभाकर सोनवणे, जमील शेख, ज्ञानेश्वर कोळी, विकास निकम आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com