पोलिसांवर हल्ला करणार्‍या सराईत गुन्हेगाराची जळगावात काढली धिंड

पोलिसांचा तगडा बंदोबस्त; परिसरात बघ्यांची प्रचंड गर्दी
पोलिसांवर हल्ला करणार्‍या सराईत गुन्हेगाराची जळगावात काढली धिंड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

घरफोडीच्या गुन्ह्यात ( burglary) आरोपीला (accused) पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांशी हुज्जत घालून (Fighting with the police) चावा घेवून जीवघेणा हल्ला (Fatal attack) करणारा सराईत गुन्हेगार (Sarait criminals) जुबेर उर्फ डबल भिकन शेख (वय-25) याची गेंदालाल मिल परिसरातून धिंड (Dhind) काढली. यामुळे परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी जुबेर उर्फ डबल भिकन शेख याला ताब्यात घेण्यासाठी दि. 30 रोजी शहर पोलिस (police) ठाण्याचे पथक गेले होते. पोलिसांची चाहूल लागताच डबल हा शेजारी राहणार्‍या अफसरबेग नूरबेग उर्फ कालू यांच्या घरात घुसला. त्यावेळी पोलीसांना धमकी देवून माझ्याजवळ येवू नका नाही तर स्वत:ला मारून टाकेन अशी धमकी दिली. गच्चीवर जावून पोलीसांच्या अंगावर गॅस सिलेंडर (Gas cylinder thrown) फेकले होते. गच्चीवरुन उडी मारल्यानंतर त्याला पोलिसांना पकडले असता, त्याची आई मुमताजबी व भाऊ फारुख यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मुमताजने पोलीस कर्मचारी प्रफुल्ल धांडे यांच्या पाठीला चावा घेत त्यांना जखमी (Injured) केले होते. संशयीत जुबेर याच्यावर घरफोडी, जबरी चोरी असे विविध गंभीर गुन्हे (Serious crimes) दाखल आहेत.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

सराईत गुन्हेगाराची त्याच्याच परिसरातून धिंड काढल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, सपोनि सर्जेराव क्षिरसागर, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, नरेंद्र ठाकरे, प्रणेश ठाकूर, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण यांची उपस्थिती होती.

बेड्या घालून धिंड

पोलीसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आज सराईत गुन्हेगाराच्या घराची झडती घेण्यासाठी त्याला घरी घेवून गेले होते. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगार जुबेर उर्फ डबल यांची याची हातात बेड्या ठोकून राहत्या घरापासून गेंदालाल मिल परिसर धिंड काढण्यात आली.

4 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

सराईत गुन्हेगार जुबेर उर्फ डबल याला शुक्रवारी न्यायाधीश सुवर्णा कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 4 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Related Stories

No stories found.