अनैतिक संबंधातून तरुणावर हल्ला

तिघा संशयितांना अटक
अनैतिक संबंधातून तरुणावर हल्ला

यावल । Yawal

शहरातील काजीपुरा (Kazipura) वस्तीतील तरुणावर तीन जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री पीर बाबा दर्ग्या (Peer Baba Dargah)जवळ घडली. हा हल्ला त्याच परिसरात राहणार्‍या एका विवाहित महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून झाला असल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. याप्रकरणी रात्री यावल पोलिसांनी तिघा आरोपीना ताब्यात घेतले आहे.

जावेद युनुस पटेल (वय21) याचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. याचा राग आल्याने फैजपूर (Faizpur) येथील तीन जणांनी जावेद पटेल यास गोड बोलून दुचाकीवर बसवत घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ आणले. त्या ठिकाणी चाकूने (Knife) सपासप वार करून जिवघेणा हल्ला केला व तीनही संशयित आरोपी फरार झाले. याबाबत येथील पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. जखमीस रात्री जळगाव येथे सामान्य रुग्णालयात (General Hospital) पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या वेळी जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.

यावल पोलिसांनी जखमी जावेद पटेल यांच्याशी प्रत्यक्ष भेटून आरोपींची नावे जाणून घेतली त्यानुसार तपासाची चक्रे फिरवून ताह नगर फैजपूर येथुन शे.मुजल्लीन उर्फ मजु शे.हकीम, हिदायत अली उर्फ राजू शेखावत अली (रा.ताह नगर, फैजपूर), शे.सोयब शे.इकबाल खाटीक यांना रात्री ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.