तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल
तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

जळगाव (jalgaon) -

तालुक्यातील एका गावात ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामदास श्रावण पवार (वय ६०) यांच्याविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात चिमुकली ही तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. मंगळवारी चिमुकली घरी असतांना सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास रामदास पवार हा तिच्या घरी आला. त्याने मुलीला दुकानावर अंड तसेच गोळ्या घेण्यास पाठविले. त्यानंतर मुलगी परत आली असता चिमुकलीला तिच्या घराबाहेर मोरीमध्ये नेवून तिच्या शारिरीक अत्याचार केला.

मुलीची आई घरी आल्यावर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर चिमुकलीच्या आई याबाबत रामदास पवार याच्याविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र साळुंके करीत आहेत.

Related Stories

No stories found.