अत्याचारी संशयितास काळे फासण्याचा प्रयत्न

अत्याचारी संशयितास काळे फासण्याचा प्रयत्न

शिवसेनेच्या महिला पदाधिकारी संतप्त; संशयित आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

धरणगाव (Dharangaon) शहरात आठ व पाच वर्षीय अल्पवयीन मुलींचा (minor girls) विनयभंग (Debauchery) करणार्‍या चंदुलाल शिवराम मराठे (Chandulal Shivram Marathe) (वय 62) याला मंगळवारी न्यायालयात (court) हजर करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या (Shiv Sena) संतप्त महिला पदाधिकार्‍यांनी (Women office bearers) न्यायालयाच्या बाहेर त्याला काळे (Black) फासण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या महिलांना चुकवून त्याला न्यायालयातून बाहेर काढले. दरम्यान, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

धरणगाव शहरात दोन बालिकांचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी (Accused) चंदुलाल मराठे याच्याविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. त्याला सुरूवातीस एक दिवसाची पोलिस कोठडी (Police cell) सुनावण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले.यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काळिमा फासणारी (Stigmatizing) घटना असल्यामुळे न्यायालयाच्या आवारात शिवसेनेच्या ((Shiv Sena)) महिला पदाधिकार्‍यांनी (Women office bearers) शिवसेना स्टाईल चंदुलाल मराठे याला चोप देण्याचा प्रयत्न केला. यामुळे न्यायालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

न्यायालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त

संशयित आरोपी चंदुलाल पटेल याला न्यायालयात (court) आणणार असल्याने त्याच्यावर शिवसेनेच्या महिलांकडून काळे फासण्याचा प्रयत्न होऊन काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा न्यायालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त (Police settlement) तैनात करण्यात आला होता. दरम्यान दोन वेळा शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी पोलीसांचे वाहन रोखण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे न्यायालय परिसरात तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.

शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांचा सिनेस्टाईल पाठलाग

संशयित आरोपी चंदुलाल मराठे याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना मिळाली होती. त्यामुळे संशयित आरोपीला काळे फासण्यासाठी दुपारी दोन वाजेपासूनच शिवसेनेच्या महिला पदाधिकारी सरिता माळी, शोभा चौधरी यांच्यासह इतर महिला न्यायालयाच्या (court) आवारात थांबून होत्या. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे पोलिसांनी आधीच सावधगिरी बाळगली. दरम्यान न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांना गुंगारा देत दुसर्‍या एका वाहनातून चंदुलाल मराठे याला पुढच्या गेटने बाहेर काढले. यावेळी महिलांनी पाठलाग करुन काळे फासण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न असफल ठरला. दरम्यान, न्यायालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी न्यायालयात थांबून होते.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com