Breaking #उत्राण येथे सख्खा भाऊ बनला पक्का वैरी

लहान भावाच्या डोक्यात मुसळ मारुन केली हत्या
Breaking #उत्राण येथे सख्खा भाऊ बनला पक्का वैरी

उत्राण, Utran ता. एरंडोल ।

येथे सख्ख्या भावाने (close brother) लहान भावाचा(younger brother) डोक्यात (head) मुसळ घालून खून (murder) केल्याची घटना दि.17 रोजी उघडकीस आली. या प्रकरणी मोठ्या भावास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उत्राण गुजर हद्द येथे आई-वडील वारल्यानंतर व दोघांचेही लग्न न झाल्याने दोघे भाऊ भगवान धोंडू महाजन (वय 58) व सत्यवान धोंडू महाजन (वय 55) हे एकत्र राहत होते. दि.13 रोजी रात्री दोघांमध्ये मालमत्तेचा वाद झाल्याचे सांगण्यात येते. यानंतर भगवान महाजन याने लहान भाऊ सत्यवानच्या डोक्यात मुसळी टाकून त्याचा खून केला. दुसर्‍या दिवशी बुधवारी दिवसभर घरात प्रेत पडून होते. भगवान याने संध्याकाळी भाड्याची सायकल आणली व मध्यरात्रीच्या सुमारास सत्यवानचे प्रेत गोणपाटात भरून गिरणा नदीपात्रात सोडून आला.

हे प्रेत भातखेडे शिवारात महादेव मंदिराजवळ गिरणा पात्रात आढळून आले. भातखेडे पोलीस पाटील रेखा शामकांत पाटील यांनी मृतदेह आढळून आल्याची कासोदा पोलीस स्टेशनला खबर दिली. यावरून कासोदा पो.स्टे.ला र.नं.20/2022, सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दरम्यान गावात सत्यवान बेपत्ता झाल्याची कुजबूज सुरू होती. आणि ही माहिती ग्रामस्थांनी पोलीस पाटील राजेंद्र महाजन यांना दिली. त्यांनी कासोदा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी नीता कायटे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्‍यांनी तपास चक्र फिरवली. भातखेडे जवळ आढळून आलेला मृतदेह हा सत्यवान धोंडू महाजन याचाच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली.

प्रेत जागेवरून उचलणे शक्य नसल्याने एरंडोल येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी जागेवरच शवविच्छेदन करून तेथेच दफनविधी करण्यात आला. घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. संशयित भगवान धोंडू महाजन याला एरंडोल बस स्थानकावरुन हेड कॉन्स्टेबल इम्रान पठाण, मनोज पाटील यांनी ताब्यात घेतले.

घटनास्थळी पाचोरा विभागाचे डी वाय एस पी भारत काकडे, कासोदा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी नीता कायटे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास हा नंदकुमार पाटील, समाधान सिंहले, नितीन मनोरे हे करीत आहेत.

दरम्यान भगवान महाजन याच्यावर काही कर्ज झाले होते व तो राहते घर विकण्याच्या तयारीत होता. मात्र त्यास सत्यवान याचा विरोध होता. यातूनच दोघा भावांमध्ये खटके उडून लहान भावाचा भगवान यानेे खून केला, अशी चर्चा गावात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com