राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे प्रोेसिंडींग सचिवांच्या घरी

संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन सत्ताधारी व सचिवांमध्ये तु तु में..में..!
राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे प्रोेसिंडींग सचिवांच्या घरी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या (National Board of Education) निवडणुकीचा सोमवारी धक्कादायक निकाल लागला. नानासाहेब य.ना.चव्हाण स्मृती पॅनलने १९ पैकी १७ जांगावर दणदणीत विजय प्राप्त केला. तर विकास पॅनलच्या अवघ्या दोन जागा विजयी झाल्या आहेत. निकाल लागल्यानतंर दुसर्‍याच दिवशी मंगळवारी संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर नवीन सत्ताधार्‍यांनी संस्थेच्या कार्यालयात पाय ठेवला, परंतू त्यांना संस्थेचे प्रोसिंडीग आढळुन न आले नाही, त्यांनी याबाबत विचारांना केली असता, प्रोसिडींग (Proceeding) सचिव (Secretary) अरुण निकम यांच्या घरी असल्याची माहिती मिळाली. आणि पाहिल्याच दिवशी संस्थेचे कारभार अरुण निकम यांच्या घरुन चालयाचा का ? असा प्रश्‍न नुतन सत्ताधार्‍यांकडून उपस्थित करण्यात आला.

राष्ट्रीय शिक्षण मंडळाची निवडुक यंदा बर्‍याच मुद्यासह जागेच्या प्रश्‍नावर गाजली. निवडणुकीत अरुण निकम यांच्या पॅनलचा अक्षरक्षा धुव्वा उडला. आणि स्मृती पॅनलचा दणदणीत विजय झाला. परंतू अरुण निकम हे निवडुन आले. निकालानतंर आज स्मृती पॅनल्या सदस्यांनी पहिल्याच दिवशी संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर संचालक धनजय चव्हाण, भैय्यासाहेब पाटील, महेश चव्हाण, सुनिल देशमुख, अविनाश देशमुख, भाऊसाहेब पाटील आदी राष्ट्रीय विद्यालयाच्या कार्यालयात भेट देण्यासाठी गेले. त्यानी तेथील कामकाजाचा आढावा घेतला असता, संस्थेचे प्रोसिडींग बुक आढळुन आले नाही. याबाबत कर्मचार्‍यांना विचारांना केली असता, संस्थेचे प्रोसिंडींग बुक हे सचिव अरुण निकम यांच्या घरी असल्याची माहिती मिळाली.

चव्हाण व भैय्यासाहेब पाटील यांनी लागलीच अरुण निकम यांना प्रोसिंडींग कार्यालयात घेवून या, असा निरोप पाठवला असता, अरुण निकम हे तासभरानतंर संस्थेच्या कार्यालयात आले. व त्यांनी रितसर प्रोसिंडींग संस्थेच्य कार्यालयात जमा केले.

यावेळी भैय्यासाहेब पाटील यांनी प्रोसिडींग पाहणी करुन, प्रोसिडींग मधील कोर्‍या कागदावर रेघा ओढल्या. त्यानतंर प्रोसिंडींग हे संस्थेच्या कार्यालयातील कपाटात सचिव अरुण निकम व नुतन संचालक यांच्या स्वाक्षर्‍या घेवून सीलबंद करण्यात आले. तत्पूर्वी अरुण निकम व भैय्यासाहेब पाटील यांच्यात प्रोसिडींग घरी नेण्यावरुन तु तु..में में. झाली. व तुम्ही निवडणुक लागल्यानतंरच सर्व कामकाज आटपुन प्रोसिडींग का ? संस्थेच्या कार्यालयात जमा केले नाही. असा प्रश्‍न अरुण निकम यांना करण्यात आला.

त्यावर सहकार कायद्याअंतर्गत संस्थेचा सचिव हा जबाबदार व्यक्ती असून तो कामकाजासाठी प्रोसिडींग घरी नेवू शकतो, अशी माहिती अरुण निकम यांनी उपस्थितांना दिली. पहिल्याच दिवशी संस्थेच्या कार्यालयात प्रोसिडींगवरुन वादंग झाल्यामुळे भविष्यात संस्थेच्या कारभाराबाबत अनेक गुपीत बाहेर येणार असून मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्रचार देखील उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडनुक लागल्यानतंर कायद्याप्रमाणे संस्थेचे प्रोसिडींग संस्थेत जमा करणे अपेक्षित होते. परंतू ते सचिवानी जमा केले नाही, आता यात कायदेशिररित्या काय? करता येईल याची माहिती घेवून, आम्ही सर्वानुमते पुढील निर्णय घेणार आहोत.

भैयासाहेब पाटील, संचालक

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com