
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील (District Deputy Registrar Office) दाखल दाव्यातील निकालाच्या सत्यप्रती देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारतांना (accepting a bribe) सहाय्यक सहकार अधिकार्याला (Assistant Co-operative Officer) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti-corruption department team) मुद्देमालासह रंगेहात (Caught red-handed with the issue) पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने 2013 मध्ये दुसखेडा (ता. यावल) येथील गट क्रमांक 165 मधील 97 आर इतकी टायटल क्लीअर शेतजमीन विहीत खरेदीखत करून विकत घेतली होती. 2014 मध्ये शेतजमिनीचे पूर्वाश्रमीचे मूळ मालक नीलेश पाटील यांनी ती शेतजमीन परत मिळण्यासाठी भुसावळ येथील न्यायालयात दिवाणी दावा दाखल केलेला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना 2018 मध्ये पुन्हा नीलेश पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव या कार्यालयात शेतजमीन परत मिळण्यासाठी दावा दाखल केलेला होता.
या दाव्याच्या प्रत्येक सुनावणीसाठी तक्रारदार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव कार्यालयात दाव्याचे कामकाज पाहणारे संशयित सहाय्यक सहकार अधिकारी शशिकांत नारायण साळवे (रा. पिंप्राळा, जळगाव) यांच्यासमोर हजर राहिले होते. या दाव्याचा निकाल लागल्यानंतर तक्रारदाराने साळवे यांना कार्यालयात जाऊन भेटून त्यांच्याकडून निकालाची प्रत मिळविली होते. निकालाच्या अंतिम आदेशात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम अन्वये आदेश असे नमूद असून, त्याची प्रत पोलिस अधीक्षकांना देण्यात आली व तक्रारदारांना दाव्याच्या निकालाप्रमाणे त्यांच्या स्वतःवर सावकारी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो, तसेच शेतजमीन परत करण्याचे आदेशित केले होते, म्हणून तक्रारदाराने त्याविरुद्ध अपिल करण्याचे ठरवून त्यासाठी लागणार्या निकालाच्या सत्यप्रती घेण्याचा लेखी अर्ज संबंधित अधिकार्याकडे दिला होता.
सत्यप्रती घेण्यासाठी तक्रारदाराकडून साळवे यांनी 20 हजार रुपयांची मागणी केली. या पैकी दहा हजारांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक शशिकांत एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. के. बच्छाव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलिस नाईक बाळू मराठे, राकेश दुसाने आदींनी ही कारवाई केली.