थकबाकी न भरलेल्यांच्या मालमत्तेचा होणार लिलाव

शास्ती माफिची अभय योजनेचे शेवटचे पाच दिवस; महापालिकेचा इशारा
jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporation

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

मालमत्ता थकबाकी (Property outstanding) वसुली करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून थकीत रकमेवर शास्ती माफिची अभय योजना (Abhay Yojana) राबविण्यात आली आहे. या योजनेचे शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिल आहे. आतापर्यंत 98.26 कोटींचा भरणा मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे. तसेच ज्या थकबाकी (arrears) मिळकत धारकांना अधीपत्र बजाविण्यात आली आहे. त्यांनी थकाबाकी न भरल्यास त्यांच्या मालमत्तेचा लिलाव (auctioned) करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने (Municipal administration )दिला आहे.

शहरातील मालमत्ता मिळकत थकबाकी धारकांना थकबाकी वसुलीचा जास्तीत जास्त भरणा करता यावा. यासाठी मनपा आयुक्तांनी थकीत रकमेवर शास्ती माफीची अभय योजना दि. 5 फेबु्रवारी ते दि. 31 मार्चपर्यंत राबविण्यात आली आहे. या योजनेला नागरिकांकडून उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे.

योजना लागू झाल्यापासून आजपर्यंत 9.23 कोटी रुपये निव्वळ वसुली व एकूण सूट रक्कम 9.03 कोटी असे एकूण 98.26 कोटी रुपयांचा निधी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. यामध्ये जिओ मोबाईल टॉवर धारकांनी 1.25 कोटी रुपये भरणा केलेला आहे.

अभय योजनेचा लाभ घेण्याचे शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिले आहे. तरी मालमत्ता थकबाकीधारकांनी या शास्ती माफी अभय योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, महसूल उपायुक्त गणेश चाटे यांनी केले आहे.

जाहीर लिलावासह बोजा चढविणार

ज्या थकबाकी मिळकत धारकांना जप्तीची नोटीस बजावण्यात आलेली आहेत. त्या मालमत्ताधारकांनी दि. 31 मार्च पर्यंत थकबाकी रकमेचा भरणा न केल्यास त्यांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येईल . तसेच अशा मालमत्तांवर बोजा चढवण्याची कारवाई मनपा अधिनियम अंतर्गत करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

201 मालमत्ता धारकांना बजावली नोटीस

महापालिकेने वसुलीसाठी नेमलेल्या एकूण 12 पथकांनी धडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आजपर्यंत एकूण 181 नळ संयोजन बंद केलेले असून एकूण 201 मालमत्ताधारकांना जप्तीची नोटीस बजाविण्यात आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com