मालकाच्या नातवावर प्राणघातक हल्ला: सालदाराला पाच वर्ष सश्रम कारावास

जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा ; 14 साक्षीदार तपासले
मालकाच्या नातवावर प्राणघातक हल्ला: सालदाराला पाच वर्ष सश्रम कारावास

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तालुक्यात शेतमालकाच्या नातवावर (owner's grandson) प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपी सालदारास (Saldar) न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास (imprisonmen) व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटनेकर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. सुतिलाल उर्फ शांताराम बाबुलाल पावरा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याने गजानन शिवाजी पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे दि. 25 मार्च 2019 रोजी दुपारी 3.00 वाजता खटल्यातील फिर्यादी शशिकांत पाटील यांचा लहान भाऊ गजानन शिवाजी पाटील हा खळ्यात म्हशीचे दूध काढण्यासाठी गेला. त्यावेळी खळ्यातील सालदार सुतिलाल उर्फ शांताराम बाबुलाल पावरा मद्यधुंद अवस्थेत हातात कोयता घेवून पत्नी गिता हीच्यासोबत भांडत होता. गजानन पाटील भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करीत असतांना त्याचा राग येवून आरोपी सुतीलाल याने कोयताने त्याचे डोक्यावर व उजव्या पायावर वार केले व जिवे मारण्याचा प्रयत्न केला व तेथुन आरोपी पळून गेला.

याबाबत तालुका पोलिस ठाण्यात जखमी गजानन यांचा भाऊ शशिकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या हल्ल्यात जखमी गजाननचा मृत्यू झाल्याने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस 27 मार्च 2019 ला अटक करण्यात आली तेव्हापासून तो कारागृहात आहे.

हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटनेकर यांच्या न्यायालयात चालला. 302 कलमाखाली प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने आरोपीस त्यातुन निर्दोष ठरविले आहे. मात्र गजानन यास विळ्याने डोक्यावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन जखमी गजाननची साक्ष तसेच वैद्यकीय पुराव्याचे आधारे आरोपी यास भादवि कलम 307 अन्वये दोषी धरून आरोपी सुंतिलाल उर्फ शांताराम बाबुलाल पावरा यास कलम 307 अन्वये 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवसाची साधा कारावासाची शिक्षा सुनावली

14 साक्षीदार तपासले

सरकारपक्षातर्फे एकुण 14 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात पिडीता व तिच्या आईची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारपक्षातर्फे अति शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहीले. तसेच पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी व केस वॉच पो.कॉ. 1178 महेंद्र सोनवणे यांनी सरकारपक्षास सहकार्य केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com