शेंदुर्णीत एकावर प्राणघातक हल्ला, नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल

शेंदुर्णीत एकावर प्राणघातक हल्ला, नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल

शेंदुर्णी Shendurni ता. जामनेर

येथे वाडी दरवाजा परीसरात गाडी लावण्याच्या किरकोळ वादातुन (minor disputes) एकावर प्राणघातक हल्ला (Assault) करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल (Filed a crime) झाला असुन यामध्ये येथिल नगरपंचायतचा सत्ताधारी नगरसेवकाचा (ruling corporator) सहभाग आहे. दोन जणांना अटक तर अन्य ३ हल्लेखोर फरार आहेत.

सविस्तर वृत्त असे की, फिर्याद दिल्यानुसार सायंकाळच्या सुमारास येथिल वाडी दरवाजा परीसरात गाडी लावण्यावरून फिर्यादी समाधान पाटील याने हटकल्याने वाद झाला. समाधान पाटील शेंदुर्णी दुरक्षेत्र कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता तेथून परत येत असतांना मारोती मंदीराजवळील भावसार टी जवळ रात्री १० वाजेच्या सुमारास गोविंद अर्जुन बारी, सागर सुभाष ढगे, विकी सुभाष ढगे, शरद बाबुराव अस्वार, शिवम गजानन गुजर सर्व रा. वाडी दरवाजा हे शरद अस्वार याच्या इंडीका गाडीमधून आले. यातील गोविंद अर्जुन बारी याने समाधानच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकत सोबत आणलेल्या फावडयाचे दांडे, लोखंडी रॉड आणि इतर साहित्याने प्राणघातक हल्ला चढवित मारत गंभीर जखमी केरीत उजव्या पायावर मार बसल्याने पायाचे हाड मोडले, तर डोक्यावर झालेल्या वारमध्ये कान कापला, तर मार चुकवण्यासाठी हात पुढे केला असता हाताची बोटे मोडली आहेत या गंभीर अवस्थेत समाधान याने कशीबशी सुटका करून घेतली.

गंभीर अवस्थेत प्राथमिक उपचार करीत जळगाव येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. समाधान याने दिलेल्या फिर्यादीनुसार पहुर पोलिस स्टेशन येथे प्रथम भाग- 5 गुरंन 479/2021 भादंवि .143.147.148.149.325.324.323.504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू असतांना तपास अधिकारी ए एसआय शशिकांत पाटील यांनी फिर्यादीचा प्रत्यक्ष जबाब घेत चौकशी करून अहवाल वरीष्ठांकडे सादर केला असता यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न कलम ३०७ वाढविण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय दिपक मोहिते करीत आहेत. आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन इतर तीन फरार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com