खडसेंच्या कन्येवर प्राणघातक हल्ला

अ‍ॅड.रोहिणी खेवलकर थोडक्यात बचावल्या : लोखंडी शस्त्राने कारची तोडफोड
खडसेंच्या कन्येवर प्राणघातक हल्ला
रोहिणी खडसे

मुक्ताईनगर / जळगाव । Muktainagar / Jalgaon

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंच्या कन्या, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे ( Former District Bank Chairperson Adv. Rohini Khadse) यांच्या कारवर अज्ञात गुंडांनी (Unidentified thugs on the car) सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हल्ला (Attack) केल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी वादातून (Shiv Sena-NCP dispute) हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

अ‍ॅड.रोहिणी खडसे या रात्री साडेआठ वाजेच्या चांगदेव येथून एका हळदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावून काहीवेळ सूतगिरणीत थांबल्यांनतर मानेगावहून मुक्ताईनगरकडे येत असतांना एम.एच.19 सी.सी.1919 या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना दुखापत झालेली नाही. हल्ला केल्यानंतर काही क्षणातच हल्लेखोर फरार झाले. हे हल्लेखोर पाच ते सहा जण असून त्यांच्याकडे लोखंडी रॉडसह शस्त्रे असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आ.चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष पेटला आहे. त्यातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

कार्यकत्यांना शांततेचे आवाहन

रात्री अकरा वाजेच्या सुमारास खा. रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे व रोहिणी खडसे यांनी कार्यकर्त्यांना सामोरे जात शांतता पाळण्याचे आवाहन केले. योगेश कोलते यांनी सांगितले की आमचा लढा पक्षाविरुद्ध नसून प्रवृत्तीविरुद्ध आहे. झालेला हल्ला हा भ्याड असून रोहिणीताई यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. उद्या सकाळी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्यासह दंगा नियंत्रण पथक व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना माहिती दिली - एकनाथराव खडसे हल्लेखोरांकडे पिस्तूल व तलवारी होत्या. हल्ला कुणी केला? हे माहीत असले तरी मी ते आता सांगणार नाही. पोलीस तपासात ती माहिती समोर येईल, सध्या मी प्रवासात आहे. या हल्ल्याप्रकरणी रोहिणी खडसे तक्रार दाखल करतील. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांना माहिती दिल्याचे एकथराव खडसे यांनी ‘देशदूतशी’ बोलतांना सांगितले.

एकनाथराव खडसे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com