
रावेर|प्रतिनिधी raver
महाराष्ट्र (maharastra) पेन्शनर्स असोसिएशन पुणे (pune) आयोजित सेवानिवृत्तांच्या शिखर संघटनेमार्फत पेन्शनर्स दिनाचे औचित्य साधून आशालता लिलाधर राणे (रावेर) यांना निवृत्ती सेवा पुरस्कार सन 2021-22 पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा सोहळा औरंगाबाद (aurangabad) जिल्ह्यात पैठण (Paithan) येथे मंत्री संदिपान भुमरे (Minister Sandipan Bhumre) (रोजगार हमी ग्रामीण योजना मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई) तथा पालकमंत्री औरंगाबाद व अध्यक्ष एन डी मारणे यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सरचिटणीस लक्ष्मण टेंबे,कोषाध्यक्ष श्रीमती अपर्णा कुलकर्णी,कार्याध्यक्ष वसंतराव वाबळे तसेच वसंतराव सबनीस, जळगांव जिल्हाध्यक्ष सदाशिव सोनवणे , हिम्मतराव पाटील, खंडेराय, कणीराम परदेशी, धनराज पाटील आदि उपस्थित होते.