मुख्याध्यापक महामंडळ प्रभारी अध्यक्षपदी जे.के. पाटील यांची निवड

रावेर तालुक्याला पहिल्यांदा मिळाला मान
मुख्याध्यापक महामंडळ प्रभारी  अध्यक्षपदी जे.के. पाटील यांची निवड

रावेर|प्रतिनिधी Raver

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या अध्यक्षपदी खिरवड (ता.रावेर जि. जळगांव) येथील विकास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के. पाटील यांची निवड करण्यात आली आहे. रावेर तालुक्याला पहिल्यांदा हा मान मिळाला असल्याने,जिल्ह्यासह रावेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळची ऑनलाइन सभा दि.१ मे रोजी सायंकाळी ६ वा. पार पडली. यात कार्यकारिणीच्या सर्व सभासदांनी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के.पाटील यांच्या निवडीच्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली.

महामंडळाचे प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांना २ वर्ष कामकाज सांभाळत येणार आहे.महामंडळ अध्यक्ष विजयसिंह गायकवाड (सांगली)यांच्या निधनाने जागा रिक्त झालेली होती.या ठिकाणी जे. के.पाटील यांची वर्णी लागली आहे.त्यांनी जळगांव जिल्हा माध्यमिक शाळा संघाचे ९ वर्ष संपादक,९ वर्षापासून मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे ८ वर्षांपासून उपाध्यक्ष,२०१३ मध्ये नेवासा येथे झालेल्या मुख्याध्यापक महामंडळाच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com