चोरलेली दुचाकी गहाण ठेवत करीत होता मौजमस्ती...

चोरी करण्यासाठी येताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; शहर पोलिसांची कामगिरी
चोरलेली दुचाकी गहाण ठेवत करीत होता मौजमस्ती...

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

चोरलेल्या दुचाकी (bike) ओळखीच्या लोकांकडे गहाण ठेवून मिळालेल्या पैशांतून मौजमस्ती करणार्‍या पवन प्रेमचंद पाटील (कुंवर) वय-26 रा. आव्हाणी ता. धरगणाव (dharangaon) या सराईत दुचाकी चोरट्याच्या शहर पोलिसांनी (police) कोर्टचौकातून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरी केलेल्या 11 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

चोरलेली दुचाकी गहाण ठेवत करीत होता मौजमस्ती...
Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा...!
चोरलेली दुचाकी गहाण ठेवत करीत होता मौजमस्ती...
मानेवर चाकू लावून अत्याचार करणारा जेरबंद

शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षकांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी गुन्हे शोध पथकाला दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

महिनाभरापासून गुन्हे शोध पथकातील कर्मचारी दुचाकी चोरट्याच्या मागावर होते. चोरीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेला सराईत चोरटा पवन पाटील हा तीन ते चार दिवसांपुर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. पवन हा कोर्ट चौकात दुचाकी चोरण्यासाठी आला असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली असल्याने ते येथे सापळा रचून बसले होते. दरम्यान, पवनने कोर्ट चौकातून दुचाकी लांबविताच त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

सुरत, नाशिकसह जिल्ह्यातून लांबविल्या दुचाकी

रंगेहाथ पकडलेल्या सराईत चोरटा पवन पाटील याने नाशिक येथून 2, सुरत येथून 2 यासह जळगाव शहरातून 7 असा एकूण चोरीच्या 11 दुचाकी काढून दिल्या आहेत. तसेच त्याच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

या पथकाची कामगिरी

ही कामगिरी पोनि विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, पोना प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, पोकॉ रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com