धक्कादायक ; पतीने विष घेताच पत्नीने दोन चिमुकल्या मुलींसह विहीरीत घेतली उडी

धक्कादायक ; पतीने विष घेताच पत्नीने दोन चिमुकल्या मुलींसह विहीरीत घेतली उडी

धानोरा, ता.चोपडा chopada

घरगुती भांडण शिगेला पतीने विष घेताच पत्नीची दोन मुलींसह विहरीत उडी घेऊन आत्महत्या धानोरा (ता.चोपडा) घरगुती कारणावरुन भांडणाचा वाद शिगेला गेल्याने पतीने संतापात विष घेतले. यानंतर पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.

ही हृदयद्रावक घटना बिडगाव ता. चोपडा येथे बुधवारी रात्री ११ वाजता घडली. विनोद विक्रम सपकाळे (कोळी) (३८) असे विष घेतलेल्या इसमाचे नाव आहे. त्याने विष घेतल्याचे समजल्यानंतर पत्नी वर्षा सपकाळे हिने कीर्ती (८) व मोनिका ( ४) या दोन मुलींसह विहीरीत उडी घेतली.

रात्रभर शोध घेतल्यानंतर गुरुवारी सकाळी माय लेकींचे मृतदेह गावाजवळील विहिरीत आढळून आले.

विनोद यास जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने बिडगावसह परीसर हादरून गेला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com