ग्राहक कुंटणखान्यात शिरताच लांबवायचा दुचाकी

अट्टल चोरट्याकडून 15 दुचाकी हस्तगत; शहर पोलिसांची कामगिरी
ग्राहक कुंटणखान्यात शिरताच लांबवायचा दुचाकी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

ग्राहक (customer) कुंटणखान्यात (Kuntankhana)शिरताच त्यांच्या दुचाकी लांबविणार्‍या (Bicycle extenders) अट्टल दुचाकी चोरटा (staunch two-wheeler thief) रोहित तुळशीराम कोळी (वय-19) रा. चौगाव ता. चोपडा याच्या दाणाबाजारातून शहर पोलिसांनी (city police) मुसक्या आवळल्या (arrested). त्याची कसून चौकशी केली असता, त्याने चोरी केलेल्या 15 दुचाकी (Stolen bikes) काढून दिल्या आहेत. दरम्यान, दोन दिवसात 26 दुचाकी (26 bikes) पोलिसांनी हस्तगत (Caught by the police) केल्याची माहिती पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव शहरातून रोज दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी कर्मचार्‍यांना चोरट्यांच्या मागावर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी दि. 15 रोजी अट्टल दुचाकी चोरटा रोहीत कोळी हा दाणाबाजारात दुचाकी चोरण्यासाठी आला असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली होती.

त्यांनी तात्काळ दाणाबाजारात सापळा रचून रोहीत कोळीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्या साथीदाराच्या मदतीने अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याला सोबत घेवून पोलिसांनी जिल्ह्यातील ग्रामीण भातातून चोरीच्या 15 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

तर दोन दिवसांपुर्वी याच पथकाने धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील पवन प्रेमचंद पाटील या दुचाकी चोरटयाकडून चोरी केलेल्या 11 दुचाकी केल्या असून दोन दिवसात पोलिसांनी चोरीच्या 26 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

नातेवाईक मित्राच्या संगतीमुळे करायला लागला चोरी

संशयीत रोहीत हा मिळेल ते काम करुन आपला उदनिर्वाह करीत होता. याठिकाणी त्याचा एक नातेवाईक मित्र भेटला. त्याच्या संगतीमुळेच रोहीत दुचाकी चोरी करायला लागला. दरम्यान, त्याचा साथीदार फरार असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यात पोलिसांनी वर्तविली आहे.

बदनामीच्या भितीपोटी पोलिसात नाही तक्रार

मध्यप्रदेश राज्याच्या सीमा भागावर असलेल्या चोपडा तालुक्यात कुंटणखान्यावर मध्यप्रदेशातील काही लोक यायचे. ते दुचाकी लावून कुंटणखान्यात शिरताच रोहीत हा आपल्या साथीदाराच्या मदतीने त्यांच्या दुचाकी लंपास करायचा.

आपली बदनामी होईल या भितीने अनेक जणांनी पोलिसात दुचाकी चोरीची तक्रार देखील दिली नसल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ उमेश भांडारकर, किशोर निकुंभ, गजानन बडगुजर, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण, रतन गीते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांच्या पथकाने केली. या पथकाला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बक्षिस जाहीर केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com