सत्य घटना असल्याने काश्मीर फाईल्स सिनेमा लोकांनीच केला हिट- योगेश सोमण

शॉर्टफिल्म मेकिंग कार्यशाळेत जेष्ठ अभिनेते सोमण यांनी दिल्या टिप्स
सत्य घटना असल्याने काश्मीर फाईल्स सिनेमा लोकांनीच केला हिट- योगेश सोमण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सत्य घटनेवरच (True to the facts) माहितीपटाचा (documentary) पाया (foundation) असतो. काश्मीर फाईल्स (Kashmir Files) हा चित्रपट सत्य घटनेवरच आधारीत असल्याने हा सिनेमा लोकांनीच (People) हिट (hit) केल्याचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक योगेश सोमण (Actor and director Yogesh Soman) यांनी एका कार्यक्रमात सांगितले.

डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय (Dr. Annasaheb GD Bendale Women's College) आणि अजिंठा फिल्म सोसायटीच्यावतीने (Ajanta Film Society) रविवारी देवगिरी चित्र साधना शॉर्ट फिल्म मेकिंग कार्यशाळेचे (Short Film Making Workshops) आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी योगेश सोमण यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या अध्यक्षा म्हणून प्रा.डॉ गौरी राणे तसेच शॉर्टफिल्म मेकिंग कार्यशाळेचे उदघाटन प्रमुख मार्गदर्शक अभिनेता, दिगदर्शक, लेखक प्रा.योगेश सोमण उपस्थित होते.

उपप्राचार्य प्रो.डॉ व्ही जे पाटील तसेच विनीत जोशी, किरण सोहळे, प्रा.सुचित्रा लोंढे , गौरवनाथ आदी मान्यवर उपस्थित होते.

सोमण पुढे म्हणाले की, कोणत्याही महितीपटाची ( डॉक्युमेंट्री ) (documentary) पटकथा लिहतांना कोण, कोणाशी, कधी, कुठे आणि का? या सगळया प्रश्नांची उत्तरे त्यात असली पाहिजेत. सत्यघटनेवरच महितीपटाची पाया असतो, माहितीपटाची (documentary) पटकथा लिहितांना प्रसंगानुसार व्हिडीओ चित्रनाद्वारे(video illustration) प्रेक्षकांच्या नजरेतून दाखवणं आवश्यक आहे. शॉर्टफिल्म (Short Film) बनवतांना आवश्यक असलेल्या बारीक बारीक टिप्स योगेश सोमण यांनी दिल्या.

पुढे बोलतांना अभिनेते सोमण यांनी सांगितले की लिहिलेल्या स्क्रिप्टमध्ये (script) कोण कोणाशी बोलतंय, कोण कोणासाठी लिहतंय हेच जर लक्षात येणार नाही तर स्क्रिप्टच बनू शकत नाही, असेही सांगितले.काश्मीर फाईल्स (Kashmir Files) मध्ये जे सत्य आहे तेच दाखवलं आहे, शेवटच्या सिनमध्ये दहशतवाद्याने (terrorists) 20 लोकांची हत्या केल्याचे दाखवले आहे जे घडलं ते तसच्या तसं दाखवलं आहे, म्हणून हा सिनेमा (cinema) प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो असंही सोमण यांनी यावेळी सांगितले. कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ गौरी राणे यांनी सांगितले की महाविद्यालयामार्फ़त देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव निमित्त खान्देशातील स्वातंत्र्यात योगदान देणार्‍या स्वातंत्र्य सैनिकांचे माहितीपट बनवण्याचं नियोजन असल्याची माहिती यावेळी दिली.

75 माहितीपट सादर करणार

दुसर्‍या सत्रात मिलिंद सोमण यांनी संगीतले की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवामध्ये (nectar festival of freedom) ज्या ज्या स्वातंत्रसैनिकांनी योगदान दिले आहे जे इतिहासाच्या पानांवर लुप्त झाले आहेत अश्या हिरोंवर 75 माहितीपट ( डाक्युमेंट्री ) (documentary) 15 ऑगस्ट पर्यन्त बनवण्याचे टास्क प्रशिक्षणार्थींना देण्यात आला. ह्यावेळी प्रश्नोउत्तरांद्वारे प्रशिक्षणार्थींचे समाधान करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण सोहळे यांनी केलं, तसेच सूत्रसंचालन विनीत जोशी यांनी केले, तर आभार प्रा.सुचित्रा लोंढे यांनी मानले.

Related Stories

No stories found.