हातात चाकू पकडला नाही म्हणून त्याच चाकूने तरुणावर वार

हातात चाकू पकडला नाही म्हणून त्याच चाकूने तरुणावर वार

मेहरुण परिसरातील घटना : एमआयडीसी पोलिसात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल

जळगाव - Jalgaon

शहरातील मेहरुण येथे घरासमोर अंगणात उभ्या असलेल्या तरुणाने हातात चाकू धरण्यास नकार दिल्याने त्याच चाकूने तरुणावर वार करुन त्याला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. रेहान खान महमूद खान (वय २१) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मेहरुण परिसरातील मिल्लत मशिदीसमोर रेहान खान महमूद खान हा तरुण कुटुंबासह राहतो. सोमवारी दुपारी रेहान अंगणात उभा असतांना, आरिफ शहा व त्याच्यासोबत इतर दोघे जण आले. त्यांनी त्यांच्याकडील चाकू रेहान यास हातात पकडण्याचे सांगितले. रेहानने नकार दिला असता, आरिफ शहान याने त्याच चाकूने डोळ्याखाली वार केले.

तर इतर दोघांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. घटनेत रेहान हा जखमी झाला आहे. रेहाने याने दिलेल्या तक्रारीवरुन आरिफ शहा, काल्या (पूर्ण नाव माहित नाही), बंदर पूर्ण नाव माहित नाही तिघे रा. सालारनगर अशा तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com