शेंदूर्णीच्या आर्यन वानखेडेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड

शेंदूर्णीच्या आर्यन वानखेडेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड

राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत आर्यनने मिळवले सुवर्ण पदक

जळगाव - jalgaon

तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तथा रत्नागिरी स्पोर्टस् असोसिएशन (Sports Association) आयोजित ३२ व्या महाराष्ट्र (maharastra) राज्य सब ज्युनिअर मुले व मुली राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे डेरवन स्पोर्टस् कॉम्पलेक्स, सावर्डे तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे दि.१६ ते १८ मार्च २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचा संघ सहभागी झाला होता.

यात मुलांच्या २१ किलो वजन गटात आर्यन शांताराम वानखेडे याने सुवर्ण पदक पटकावले. त्याला त्याचे प्रशिक्षक श्रीकृष्ण देवतवाल, जयेश कासार, जयेश बाविस्कर, निकेतन खोडके यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. सुवर्ण पदक विजेता आर्यन वानखेडे ची २५ ते २७ रोजी ३६ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन (Atul Jain), सचिव अजित घारगे, सुरेश खैरनार, रवींद्र धर्माधिकारी, सौरभ चौबे, ललित पाटील, महेश घारगे तसेच जैन स्पोर्टस् अॅकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतूक केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com