गिरणा पुनरुज्जीवन अभियानास आर्ट ऑफ लिव्हिंगचे पाठबळ

खा. उन्मेष पाटील यांच्या गिरणा परिक्रमेला श्री.श्री.रविशंकरची यांचा आशीर्वाद
गिरणा पुनरुज्जीवन अभियानास आर्ट ऑफ लिव्हिंगचे पाठबळ

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

एक जानेवारीपासून ३८० किलोमीटरची गिरणा नदी (river Girna) परिक्रमा (Circulating) आता अंतीम टप्प्यात असून गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत (Revival campaign) लवकरच गिरणा वॉटर कप स्पर्धेचे (Water Cup competitions) आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गिरणा काठाच्या १०० गावांमध्ये पाणलोट विकासासाठी जलसंधारण, नैसर्गिक शेती,तरुणांचे व्यसनमुक्ती सह तरुण ऊर्जावान व्हावा. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या (Art of Living) माध्यमातून गावोगावी यंग लीडरशिप डेव्हल्पमेंट प्रोग्राम (Young Leadership Development Program) आयोजीत करण्यात येणार आहे.

नुकतेच खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांनी आध्यात्मिक गुरु श्री.श्री.रविशंकरजी यांची भेट घेतली असून गिरणा पुनरुज्जीवन अभियानास आर्ट ऑफ लिव्हिंगचे (Art of Living) भक्कम पाठबळ मिळणार असल्याने आर्ट ऑफ लिव्हिंगचे जनक आध्यात्मिक गुरू श्री.श्री. रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाने गिरणा परिक्रमा देशासाठी रोल मॉडेल ठरणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.

खासदार उन्मेश पाटील यांनी बंगलोर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे जनक तथा जागतिक आध्यात्मिक गुरू श्री.श्री.रविशंकरजी यांची भेट घेऊन खानदेशात नवी सिंचन क्रांती व्हावी याकरिता गिरणा नदीचे पुनरुज्जीवन अभियान सूरू केले असून सुमारे चारशे किलोमीटरची पदयात्रा आरंभली आहे. याची माहिती देऊन अभियानात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या (Art of Living) माध्यमातुन आदरणीय गुरूजींच्या मार्गदर्शनाने अभियान अधीक प्रभावी व्हावे. यासाठी प. पू. श्री श्री रविशंकर यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करन दादा पवार, प्रा. डॉ पुरुषोत्तम वायाळ, रोहन जैन, अमित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

खान्देशातील बहुचर्चित गिरणा पुनरुज्जीवन अभियानातून गिरणा नदी(river Girna) पुन्हा बारमाही वाहण्यासाठी अतिक्रमण, प्रदूषण व शोषणापासून गिरणामाईचे संवर्धन व्हावे. यासाठी केलेली गिरणा परिक्रमा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सुमारे शंभर गावांच्या पाणलोट विकासासाठी जलसंधारण, नैसर्गिक शेती, निरोगी व व्यसनमुक्त समाजासाठी युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम अशी त्रिसूत्री राबविण्याचा सल्ला दिला. परम पूज्य गुरूजींच्या त्रिसूत्रीतून गिरणा अभियान (Giraṇa abhiyana) देशासाठी रोल मॉडेल ठरणार आहे.

यावेळी खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांनी गिरणा पुनरूज्जीवन अभियानातून सात बलुन बंधारे (Balloon dams) बाबत जनजागृती करीत गिरणेचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी गिरणाकाठावरील ग्रामस्थांशी संवाद साधत असुन सात बलून बंधारेसह गिरणा काठाचा शाश्वत विकासासाठी (Development) प्रयत्नशील असून यासाठीच पदयात्रा करीत असून आपले आशीर्वाद मार्गदर्शन मिळावे अशी विनंती खासदार उन्मेश पाटील यांनी प. पू. श्री. श्री रविशंकरजी यांना केली. याप्रसंगी खासदार उन्मेशदादा यांनी गिरणा वॉटर कप स्पर्धा बाबत तसेच गिरणा खोर्‍याची संपूर्ण माहिती दिली.

यावेळी परम पूज्य श्री.श्री. रविशंकरजींनी जलसंधारणासोबत मनसंधारण करा. आपण गिरणा परिक्रमा करणारे युवा जलयोद्धा असल्याचे कौतुक करीत आशिर्वाद दिल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com