Photos # फैजपूर येथे ज्येष्ठकनिष्ठा गौरींचे आगमन

Photos # फैजपूर येथे ज्येष्ठकनिष्ठा गौरींचे आगमन

फैजपूर Faizpur ( प्रतिनिधी ) -

फैजपूर परिसरात ज्येष्ठाकनिष्ठा गौरीचे (Jeshta knishtha Gauri) आगमन (Arrival) दि. ३ सप्टेंबर २०२२ रोजी झाले असुन आज लक्ष्मीनारायण मंदिरात (Lakshminarayan Temple) महालक्ष्मी पूजन (Mahalakshmi Poojan)(गौरीपूजन) करण्यात आले आहेत. दिनांक ४ सप्टेंबर रोजी १२ ते १ च्या सुमारास पूजन करण्यात येणार आहे. दिनांक ५ सप्टेंबर उत्तर पूजन होईल . देवस्थानचा परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आली आहे. देवस्थानात ज्येष्ठ कनिष्ठ गौरीचे आगमन झाल्याने भक्तगण दर्शनास सज्ज झाले.

खान्देशात या ज्येष्ठाकनिष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात. दोन्ही बहिणी ज्येष्ठाला भेटायला कनिष्ठा येते. या महालक्ष्मीपुढे सुदंर आरास केली गेली आहे. महालक्ष्मीपूढे बाळ, गणपती असतो . ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचे मोठया उत्सहात आगमन दि. ३ रोजी झाले असून गौरींना कढी - भाकरीचा नैवद्य देतात ,१६ प्रकारच्या भाज्या, पुरणपोळी, दूध साखर असते. दुसऱ्या दिवशी म्हणजे महापूजेला पुरणाची पोळी दाखवली जातो. १६ पुरणाचे दिवे , आरती लावली जाते . ज्येष्ठाला व कनिष्ठाला ८ सुताची पायती १६.८ ची असतात या दिवशी सुवासिनींना जेवणाला बोलवून साडी चोळी देऊन ओटी भरतात. संध्याकाळी हळदी कुंकवाचा कर्यक्रम असतो. फुगड्या झिम्मा ,पिग्गा घालून जागरण करतात . अशी परंपरा लाभली आहे.

भाद्रपदातील गौरीचे आगमन अनुराधा नक्षत्रावर होते . ज्येष्ठ नक्षत्रावर महापूजा होते व मूळ नक्षत्रावर त्याचे विसर्जन होते . फैजपूर लक्ष्मीनारायण मंदिरात असंख्य भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत तांदूळ गव्हाच्या रासी भरतात, फराळ समोर ठेवतात, धातूचा मुखवटा सुदंर असतो, त्याला वेंणी, कानातले,गळ्यातले,सुदंर नऊवारी साडी अगावर डोक्याच्या बिंदीपासून, गळ्यातील विविध दागिने,मंगळसूत्र,कंबरपट्टा, बाजूबंद यासह अनेक दागिन्यांनी सजवतात.

३ दिवस भक्तीमय वातवरणात या ज्येष्ठा कनिष्ठांचे मनोभावाने भाविक या देवस्थानातं पूजन करतात व तिसऱ्या दिवशी गूळपोळी ,दहीभात याचा नैवेद्य देतात,. भक्तीमय वातावरणात या ज्येष्ठ व कनिष्ठ ला निरोप दिला जातो. अशी आख्यायिका असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचे दर्शन व प्रसादाचा लाभ भाविक भक्त मंडळींनी घ्यावा ,असे आवाहन पुजारी प्रवीण दिनकर जोशी व मनोज दिनकर जोशी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com