वर्डीचा लाचखोर ग्रामविकास अधिकारी झाला गजाआड

वर्डीचा लाचखोर ग्रामविकास अधिकारी झाला गजाआड

चोपडा । Chopda

वर्डीचे (Verdi) ग्रामविकास अधिकारी (village development officer) भगवान पांडुरंग यहीदे यांनी ठेकेदाराकडे लाचेची (Bribe) मागणी करुन, अकरा हजाराची लाच (Bribe) स्विकारली. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि.9 रोजी दुपारी 3:30 वाजता ही कारवाई केली.

वर्डी (Verdi) ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगा च्या निधीतून तक्रारदार तथा सब काँट्रॅक्टर यांनी गटार बांधकाम करून त्यावर ढापे टाकण्याचे काम पुर्ण केले होते. सदर कामाचे बिल अदा करण्यासाठी भगवान यहीदे यांनी 12,500 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 11,000 रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर चोपडा-शिरपूर रस्त्यावर हॉटेल जयेश समोर तक्रारदाराकडून लाच (Bribe) स्विकारतांना यहीदे यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली व धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर व पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, मोरे व सुधीर मोरे आदींनी केली.

Related Stories

No stories found.