जिल्हाधिकारी कार्यालयातून डंपर घेवून पळून जाणारा जेरबंद

शनिपेठ पोलिसांची कारवाई; संशयिताला तीन दिवस कोठडी
जिल्हाधिकारी कार्यालयातून डंपर घेवून पळून जाणारा जेरबंद

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील (collector office) कार्यालयाच्या आवारातून अवैध वाळूने भरलेले डंपर (dumper) पळवून (escapes) घेवून जाणरा संशयित डंपर चालक प्रफुल्ल गुणवंत नेहते (वय-26, मूळ रा. डांभुर्णी ता. यावल, ह. मु. कांचननगर) याच्या ममुराबाद नाका येथून मुसक्या (arrested ) आवळल्या. त्याला आज न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

वाळूची अवैध वाहतुक करणार्‍या (एमएच 04 जीए 2615) क्रमांकाचे डंपरवर दि. 24 डिसेंबर 2022 रोजी महसूल विभागासह पोलिसांनी कारवाई केली होती. डंपर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात घेवून गेले असता, डंपरचालकाने डंपरमध्ये बसलेल्या शासकीय कर्मचार्‍याला धक्काबुक्की करुन त्यांना डंपरमधून खाली उतरवून डंपर घेवून चालक प्रफुल्ल नेहते हा पसार झाला होता. याप्रकरणी शासकीय कामाता अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून चालक प्रफुल्ल नेहते हा संशयित गुजरात राज्यात पळून गेला होता.

संशयिताला तीन दिवसाची कोठडी

संशयित प्रफुल्ल नेहते हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो ममुराबाद नाका परिसरात असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर यांना मिळाली. त्यांनी लागलीच राहुल पाटील, राहुल घेटे, विजय निकम यांच्या मदतीने मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर केल असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com