सेवानिवृत्त शिक्षकाकडून लाच घेणारा ताब्यात

प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी मागितले होते तीन हजार
आरोपी सिकंदर तडवी
आरोपी सिकंदर तडवी

यावल (प्रतिनिधी) Bhusawal -

येथील पंचायत समितीतील शिक्षण विभागातील वरिष्ठ सहा. (शिक्षण विभाग) सिकंदर सायबु तडवी (वय ५६, रा. बीडगाव ता. चोपडा) तीन हजारांची लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आल्याची कारवाई दि. २७ रोजी करण्यात आली.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जि.प. शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांची वेतन निश्‍चिती व उपदान मिळण्यासाठीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याच्या मोबदल्यात आरोपी सिकंदर तडवी यांनी दि. १९ रोजी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यानुसार २७ रोजी पैसे स्विकरण्याचे निश्‍चित झाले. दरम्यानच्या काळात तक्रारदार सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने लाच लुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसर दि. २७ रोजी पथकाने सापळा रचुन आरोपीस रंगेहात अटक केली.

ही कारवाई डिवायएसपी गोपाल ठाकुर, पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, सहा. फौ. रविंद्र माळी, हे.कॉ.अशोक अहीरे, हे.कॉ. सुनिल पाटील, हे. कॉ. सुरेश पाटील, हे. कॉ.रविंद्र घुगे, पोना. मनोज जोशी, पोना. सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पो. कॉ. प्रविण पाटील, पो.कॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर. यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com