जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या कार्यालयातून तिजोरी लांबविणारे जेरबंद

ठाणे व वर्धा येथून दोघांच्या जिल्हापेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या
जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या कार्यालयातून तिजोरी लांबविणारे जेरबंद

जळगाव - Jalgaon

शहरातील विसनजी नगरात जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेत वॉचमनसह चालकाला टॅमीचा धाक दाखवून ६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी तब्बल अडीच लाख रूपये असलेली दीड क्विंटलची तिजोरी लांबविली होती.

या गुन्ह्याचा जिल्हापेठ पोलिसांनी छडा लावला असून विरमंगलसिंग उर्फ डॉनसिंग मायासिंग दुधाणी (वय ४७, रा. झरी, ता. जि. परभणी) व शिवसिंग विरसिंग शिकलकर दुधाणी (वय २८, रा. वर्धा) या दोघांना अटक केली आहे. दरम्यान संशयितांनी गुन्ह्यात ज्या कारचा वापर केला होता, ती कार रायगड जिल्ह्यातून चोरली असल्याचे समोर आले आहे.

संशयितांना मार्केट फेडरेशनची तिजोरी चोरण्यासाठी जी कार वापरली होती, ती कार संशयितांनी रसायनी ता.जि. रायगड येथून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारमधून संशयितांनी तिजोरी लांबविली होती. दरम्यान अटकेतील संशयित दोघांशिवाय आणखी दोन संशयित असून ते सध्या बेपत्ता आहेत. अटकेतील संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com