
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) नशिराबाद (Nashirabad) येथील टोलनाक्यावर (Toll booth) बनावट पावत्यांचा (fake receipts) मोठ्या प्रमाणात घोळ उघडकीस आला आहे. दरम्यान, या ठेकेदाराकडून (contractor) प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा (Project Director Chandrakant Sinha) यांना पाच लाख रुपये प्रति महिना हप्ता (Installment) मिळत असल्याचा आरोप (Accusation) माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता (Right to Information Activist Deepak Gupta) यांनी पत्रकार परिषदेत केला.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या पथकाने नशिराबाद टोलनाक्यावरील बनावट पावत्यांचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर जळगावात खळबळ माजली होती. हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. तसेच नहीचे विभागीय आयुक्त राजीव अग्रवाल यांनी देखील याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी जळगाव दौर्यावर आले होते.
परंतु त्यांनी चौकशी न करता केवळ भेट देवून निघून गेले. तसेच या प्रकरणी नहीचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना तक्रार देण्यासाठी पोलिस विभागाकडून सांगण्यात आले असता, त्यांच्याकडून आतापर्यंत तक्रार देण्यास टाळाटाळ केली जात असून तक्रारदारानेच पोलिसांकडे फिर्याद देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. पोलिसांकडे फिर्याद देणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
शिफ्टनुसार केली जात होती वसुली
टोलनाक्यावर पाच इन व पाच आऊटचे गेट आहे. याठिकाणी शिफ्टनुसार ड्युटी लावली जाते. दरम्यान, यातील दोन गेटवर बनावट मशिन ठेवून दुपारी 4 ते रात्री पर्यंत वाहनचालकांना बनावट पावत्या दिल्या जात होत्या. मात्र गुप्ता यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. तसेच या कर्मचार्यांना दिलेल्या खोलीत अजून पाच मशिन होत्या. परंतु संबंधित ठेकेदाराने त्या मशिन गहाळ केल्याचा आरोप देखील गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत केला.