फत्तेपूरचा आर्किटेक्ट पलाश मंडलेचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

फत्तेपूरचा आर्किटेक्ट पलाश मंडलेचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

फत्तेपूर Fatehpur ता.जामनेर वार्ताहर

भारतात दरवर्षी वास्तुरचना क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आर्किटेक्टस् (Architects)वास्तुविशारद) व काही उद्योजकांना (entrepreneurs) राष्ट्रीय पुरस्कार (National Award) देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारासाठी फत्तेपूरचा आर्किटेक्ट पलाश मंडलेचा (Architect Palash Mandala) बाजी मारलेली  आहे.

जळगांव जिल्हयातून पलाश मंडलेचा हा एकमेव उल्लेखनीय कामगिरी करणारा आर्किटेक्ट निवडला गेल्याने गावाचे व मंडलेचा परिवाराचे नांव संपूर्ण भारतात गेलेले आहे.कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणा-या मोजक्या व्यक्तींपैकी पलाश हा एकमेव आर्किटेक्ट ठरलेला आहे.

  भारतात बिगिनअप रिसर्च संस्था व काही वास्तुरचना महाविद्यालये यांचे संयुक्त विद्यमाने संपूर्ण देशात वास्तुरचना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवकांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबदल राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा बैंगलोर येथील ताज हॉटेलमध्ये पार पडला.

फत्तेपूरचा आर्किटेक्ट पलाश मंडलेचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
विद्यापीठात संशोधनातील नाविनत्येचा अविष्कार
फत्तेपूरचा आर्किटेक्ट पलाश मंडलेचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे सोमवारी सुगम गायन स्पर्धा

यावेळी भारतातून १०० ते ११० वास्तुरचनाकार व उद्योजकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातून ७ ते ८ आर्किटेक्ट निवडले गेले. तर जळगांव जिल्हयातून एकच आर्किटेक्ट निवडला गेला आणि तोही फत्तेपूर येथील कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा कल्पीत आर्किटेक्टस फर्मचे पलाश संजयकुमार मंडलेचा हा ठरला आहे.

या पुरस्कार सोहळ्यास भारतातून टाटा कन्सल्टंसी सर्विसेसचे माजी उपाध्यक्ष व बिझनेस इंडीया या मासिकाचे माजी एडिटर इन चिफ शिवानंद कानवी, इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्टचे माजी अध्यक्ष एच.एम. थिमय्या, इस्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊटंटस ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष सी.ए.के.रघु, आर्किटेक्टस कर्नाटक असोसिएशनचे माजी अध्यक्ष कृष्णराव जयसिम आदी मान्यवर उपस्थित होते. 

फत्तेपूरचा आर्किटेक्ट पलाश मंडलेचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
पांझरा किनार्‍यावरील मिनी गॅस पंपावर छापा, दोघे ताब्यात

देशातून या पुरस्कारांसाठी नामांकन मागविण्यात येते.त्यानंतर आयोजकांकडून नामांकनच्या आधारे या क्षेत्रातील कामाची सविस्तर माहिती तसेच नामांकन धारकांच्या मुलाखती घेण्यात येतात. त्यानंतर देशातील काही प्रतिष्ठित आर्किटेक्ट कडून त्याचे मुल्यांकन करण्यात येते. तेव्हा हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करून पात्र लोकांना आमंत्रित केले जाते.

या पुरस्कारामध्ये जळगांव जिल्हयातुन एका ग्रामीण भागातील फतेपूर येथील पलाश मंडलेचा यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्कार पलाश हा फत्तेपूर येथील सुरेशचंद, रमेशचंद, दिनेशचंद, प्रेमचंद मंडलेचा यांचा नातु, जामनेर येथीलसुनिल मंडलेचा, सचीन, शैलेश, संदेश यांचा पुतण्या, तर संजय मंडलेचा व सौ. सपना मंडलेचा यांचा मुलगा आहे. मंडलेचा परिवार, मित्र परिवार व नातेवाईक यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात पलाशचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com