
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
हॉटेलचालक व ग्राहकामध्ये (Between the hotelier and the customer) सुरु असलेल्या वादात मधस्ती (Mediation in disputes) करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्य () नितीन अर्जुन बुंधे (वय-34, रा. शिरसोली प्र.बो.ता. जि.जळगाव) यांच्यावर चॉपरने (attacked chopper) वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर लाकडी दांडक्याने त्याला मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना शिरसोली गावाजवळील हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ प्रशांत हॉटेलमध्ये जेवणाचे बिल जास्त लावण्यावरुन हॉटेल मालक आणि एका ग्राहकात वाद सुरू होता. याठिकाणी असलेल्या ग्रामपंचायत सदस्य नितीन बुंधे यांना वाद सुरु असल्याचे दिसताच त्यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने ग्राहक असलेल्या व्यक्ती सोबत एका व्यक्तीने त्याच्या दोन मित्राला बोलावून घेतले.
दोन्ही जणांनी नितीन बुंधे याच्यावर पाठीत चोपरने वार करून लाकडे दांडक्याने जबर मारहाण केली. नितीन बुंधे रक्तबंबाळ स्थितीत खाली पडताच एकच धावपळ उडाली. नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्रथमोपचार झाल्यानंतर नितीन बुंधे यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.