शिरसोली वीज उपकेंद्राला लवकरच मंजुरी-पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिरसोली वीज उपकेंद्राला लवकरच मंजुरी-पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव - प्रतिनिधी jalgaon

'विविध प्रयोग करून शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी नागवेल पान मळा शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्यासाठी डीपीडीसी मध्ये भरीव तरतूद करणार असून निल गायी, रोही व लोधडे या वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान किंवा हानी होऊ नये यासाठी सौर कुंपण मशीनसाठी जास्तीत जास्त निधीची यावर्षी तरतूद करणार आहे. बजेट अंतर्गत शिरसोली ते धानवड तांडा रस्ता ग्रा.मा.118 रस्त्याच्या कामासाठी 70 लक्ष तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत प्रजिमा 39 ते ते शिरसोली ग्रा.मा. 54 रस्त्याच्या व त्यावरील लहान-साहन मोऱ्यासह डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी 5 कोटी 30 लक्ष निधी मंजूर असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

शिरसोली वीज उपकेंद्राला लवकरच मंजुरी-पालकमंत्री गुलाबराव पाटील
ऐकावे ते नवलचं ; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पतीच्या उमेदवारी अर्जाची चोरी

तर शिरसोली येथे शेतकऱ्यांसाठी व उद्योजकांसाठी 80 कोटी अंदाजपत्रक असलेल्या वीज उपकेंद्राला लवकरच मंजुरी मिळणार असल्याने वीज समस्या सुटण्यासाठी मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. ते शिरसोली येथील वसंतदादा चौकात ते फिल्टर प्लांटसह पाणीपुरवठा योजनेचे आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com