विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला पुन्हा दणका
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द

जळगाव - Jalgaon

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे सरकार (Shinde Govt.) विरूध्द महाविकास आघाडी असा सामना रंगत आहे. सत्ता स्थापनेपासून शिंदे सरकारने महाविकास आघाडीचे घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारला आणखी एक दणका देत प्रवीण चव्हाण (Praveen Chavan) यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना राज्याच्या कायदा आणि न्याय विभागाने बुधवारी जारी केली आहे.

महाविकास आघाडीकडून एका सरकारी वकीलामार्फत भाजपा नेत्यांना अडकविण्याचे षडयंत्र रचले जात होते. या प्रकरणाचा तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी विधानसभेच्या अधिवेशनात ‘पेन ड्राइव्ह’ बॉम्ब फोडून पर्दाफाश केला होता. तेव्हापासून प्रवीण चव्हाण यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापन झाले.

अवघ्या अडीच महिन्यात राज्याच्या गृह विभागाने प्रवीण चव्हाण यांच्याकडे असलेल्या १९ खटल्यांचे कामकाज काढुन घेऊन त्यांची नियुक्ती रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार राज्याच्या कायदा व न्याय विभागाने बुधवारी दि. २१ रोजी अधिसूचना काढून प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून असलेली नियुक्ती तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे महाविकास आघाडीला शिंदे सरकारने (Shinde Govt.) मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com