जिल्हाधिकारी अभिजित राऊत
जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जिल्ह्यात विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नेमणुका

जळगाव - jalgaon

जिल्ह्यात 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत मोठ्या उत्साहात श्री गणेशोत्सव (Shree Ganeshotsav) साजरा होत आहे. गणपती मिरवणुका व विसर्जनाचा कार्यक्रम दृष्टीकोनातून गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी (Special Executive Magistrate) यांची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नेमणुका केल्या असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी कळवले आहे.

कायदा व सुव्यवस्था परिस्थितीबाबत अहवाल सादर करावा. नियुक्त केलेले सर्व कार्यकारी दंडाधिकारी यांनी 31 ऑगस्ट, 2022 ते 9 सप्टेंबर, 2022 पर्यंत श्री गणेशोत्सव या सणाच्या कालावधीत नेमणुकीच्या ठिकाणी बिनचूकपणे हजर रहावे. इतर आवश्यक परिस्थितीचा आढावा घ्यावा. कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी सतर्क राहून दक्षता घेण्यात यावी. संभाव्य अथवा घडलेला अनूचित प्रकाराबाबत दूरध्वनी अथवा बिनतारी संदेशाव्दारे तत्काळ जिल्हादंडाधिकारी, अप्पर जिल्हादंडाधिकारी यांना कळवावे, असे जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेशित केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com