नियुक्ती मुख्यालयात कामकाज पोलीस ठाण्यात

वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली संबंधित कर्मचार्‍याला समज
नियुक्ती मुख्यालयात कामकाज पोलीस ठाण्यात

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आर्थीक व्यवहारातून पोलीस मुख्यालयात (Headquarters) उचलबांगडी झालेला कर्मचारी (employees) चक्क पोलीस ठाण्यात (Police Station) कामकाज (Working) करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यातील इतर कर्मचार्‍यांच्या भुवया उंचवल्या आहे. अधिकार्‍यांना याबाबत विचारणा केेली असता त्यांनी संबंधिताला समज दिली असल्याचे सांगितले.

नियुक्ती मुख्यालयात कामकाज पोलीस ठाण्यात
रात्री गस्तीवर असलेले डिवायएसपीं अवैध वाळूचे डंपर पकडतात तेव्हा...
नियुक्ती मुख्यालयात कामकाज पोलीस ठाण्यात
VISUAL STORY : बॉलिवूडचा हा भाईजान झाला 57 वर्षाचा

शहरातील एका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकासह एका कर्मचार्‍याची एका आर्थीक प्रकरणातून तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस मुख्यालयात उचलबांगडी केली आहे. याच प्रकरणातील तो कर्मचारी मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर ठाणे अंमलदारांच्या खुर्ची शेजारी असलेल्या खुर्चीवर जावून तो कामकाज करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नियुक्ती मुख्यालयात कामकाज पोलीस ठाण्यात
VISUAL STORY :केवळ तुनिषाचं नव्हे तर 'या' अभिनेत्रीनींही संपवलं आयुष्य..
नियुक्ती मुख्यालयात कामकाज पोलीस ठाण्यात
VISUAL STORY : मानसी अन् प्रदीप मध्ये सुरू झालेय सोशल मीडिया वॉर

सुमारे तीन ते चार तास हा कर्मचारी ठाणे अंमलदाराच्या खुर्चीशेजारी बसून कामकाज करीत असल्याने पोलीस ठाण्यातील कर्मचारी आवक होवून त्यांना आश्चार्याचा धक्का बसला. दरम्यान, एका प्रकरणात पोलीस मुख्यालयात बदली झालेला कर्मचारी अशा पद्धतीने कामकाज करु शकतो का? असा सवाल देखील आता पोलिसांकडून उपस्थित केला जात आहे. याप्रकरणाबाबत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकार्‍यांना विचारणा केली असता, त्यांनी याबाबत बोलणे टाळले आहे.वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित कर्मचार्‍याला बोलावून समज दिली आहे.

नियुक्ती मुख्यालयात कामकाज पोलीस ठाण्यात
VISUAL STORY : या वर्षात कोणकोणत्या सेलिब्रेटींनी बांधली रेशीम गाठ
नियुक्ती मुख्यालयात कामकाज पोलीस ठाण्यात
Photos # गुढयात शिक्षक व इंजिनिअर पिता- पुत्रांनी फुलवला ड्रॅगन फ्रुटचा मळा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com