राष्ट्रीय शि.मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्जांचा पाऊस

१९ जागांसाठी १८२ अर्ज दाखल , एक जागेसाठी दहा उमेदवार रिंगणात
राष्ट्रीय शि.मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्जांचा पाऊस

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची निवडणुक संपत नाही तोच आता राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीचा (Election) बिगुल वाजला आहे. तालुक्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍यांच्या आज शेवटच्या दिवशी तब्बल एकूण १८२ अर्ज दाखल करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील निवडणुकीसाठी प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्यामुळे आतापासूनच उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असून सर्वांचे लक्ष माघारीकडे लागले आहे.

तालुक्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्जांचा अक्षरशा; पाऊस पडत आहे. शेवटच्या दिवसा अखेर १८२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यात संस्थेचे संचालक, नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. संस्थेचे ३३४३ इतके सभासद आहेत आणि संचालक मंडळाची संख्या १९ इतकी आहे. मात्र दाखल उमेदवारांची संख्या आजच्या घडीला १८२ इतकी झाली आहे. हे पाहता संस्थेच्या निवडणुकीत दोन पेक्षा अधिक पॅनल मैदानात उतरतील असे चित्र आहे.

विशेष म्हणजे चाळीसगाव एज्युकेशनमध्ये निवडुुन आलेले व पराभूत उमेदवारांना देखील लागेच राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे अनेक चर्चांना उत आला असून यांच्याशिवाय चाळीसगाव तालुक्यात शिक्षण क्षेत्रात कुणालच काहीच कळत नाही का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात असून दोघे मोठ्या संस्थेमध्ये हात ठेवणार्‍या आशा उमेदवारांबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच अर्जांची संख्या पाहता एक जागेसाठी तब्बल १० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शिक्षण क्षेत्रात सारख्या पवित्र क्षेत्रात अनेक राजकिय मंडळीनी देखील आपली उमेदवारी दाखल केल्यामुळे शिक्षण क्षेत्रातही राजकिय आखाडा निर्माण होण्याचे चिन्ह निवडणुकपूर्वीच दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com