रेखांकित गवती वटवटयाचे तापी परिसरात दर्शन

पाहुणा नव्हे स्थानिक रहिवासी असल्याचे पक्षी तज्ज्ञांचे संकेत
रेखांकित गवती वटवटयाचे तापी परिसरात दर्शन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

भुसावळ शहरातील तापी नदीच्या (Tapi river) पात्रातील गवताळ बेटावर रेखांकित गवती वटवटया (striated grassbird) या पक्ष्याची प्रथमच नोंद केली. त्याचवेळी त्याचा फोटो आणि मुख्यत्वे आवाज दोन्ही मिळाले. या पक्ष्याची प्रजात ही रेखांकित गवती वटवटया असल्याची खात्री ई-बर्डचे पक्षी तज्ञ अभिजीत आवटे (E-bird ornithologist Abhijeet Awate) यांनी दिली. तर त्याचा आवाज ब्रिडींग साँग असून विणीचा हंगाम (Vini season) सुरू झाल्याचे ते द्योतक असल्याची माहिती पक्षी अभ्यासक गिरीश जठार (Ornithologist Girish Jathar) यांनी दिली असल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ (Pakshimitra Shilpa and Rajendra Gadgil) यांनी दिली.

यापूर्वी पक्षी अभ्यासक लक्ष्मीकांत नेवे (Bird watcher Laxmikant Neve) यांनी बीटीपीएस या भागात याची नोंद घेतलेली आहे. तर पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी भुसावळ शहाराजवळ याची नोंद घेतली.तसेच रेकॉर्ड केलेला त्याचा आवाज हा ब्रिडींग साँग (Breeding Song) आहे. हे स्पष्ट झाल्यामुळे याचा अर्थ असा होतो की अन्य स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणे हा हिवाळी पाहुणा नसून आपल्या जळगाव जिल्ह्यात तापी नदीकाठच्या परिसरात त्याचा निवास असून त्याची नियमित वीण (Vini season) देखील होत आहे, याला पुष्टी मिळत असल्याचे पक्षी अभ्यासक शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले.

भारतातील मध्य भारतात तसेच हिमालय (Himalayas) पायथ्याचा उत्तर पूर्व पट्टा आणि आसाम, मणीपुर अशा सेव्हन सिस्टर प्रांतात गवताळ, झुडपी व दलदलीच्या प्रदेशात हे पक्षी निवासी आहेत.

याशिवाय भारतीय उपखंडातील (Indian subcontinent) बांग्लादेश, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशात आढळतोडोके आणि गळ्याखाली छातीवर उभ्या रेषा आणि तपकिरी पंखांवर काळ्या ठळक रेषा, पांढरी भुवई आणि अन्य वटवट्यांच्या तुलनेत याची शेपटी लांब असते. नर-मादी (Male and female) दिसायला एकसारखे असतात. फक्त नर मादीपेक्षा आकाराने थोडा मोठा असतो. मुख्य अन्न म्हणजे गोगलगायी, छोटे कोळी, कीटक व त्यांच्या अळ्या हे असते. गवताची पाती व अन्य साहित्य वापरुन हा चेंडू सारखे गोल आकाराचे घरटे तो करतो, असेही त्यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com