चाळीसगावात डेंग्यूचा दुसरा बळी

चाळीसगावात डेंग्यूचा दुसरा बळी

चाळीसगाव । प्रतिनिधी chalisgaon

चाळीसगाव परिसरात गेल्या महिनाभरापासून डेग्यूसह व्हायरस आजारास डोकेवर काढले असून शहर व ग्रामीण भागात आतापर्यत 500 च्यावर जणांना डेंग्यू लागण झाली.

शहरातील नारायणवाडी परिसरात राहणारा यश विवेक काळे (वय 14) या मुलांचा दि.2 ऑक्टोबर रोजी डेंग्यूमुळे मृत्यू झाला. तर आता पुन्हा दि,12 रोजी तालुक्यातील राजदेहरे येथील शेषराव उखा राठोड (29) या तरुणाचा डेग्यूमुळे औरंगाबाद येथे उपचार घेत असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.तालुक्यात डेग्यूच्या आजाराने थैमान घातल्याचे प्रथमदर्थी दिसून येत असून आरोग्यसह संबंधीत प्रशासनाकडून त्वरित उपयायोजना व जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com