
रावेर Raver|प्रतिनिधी-
वादळी पावसाने (torrential rain) शनिवारी पुन्हा रावेर तालुक्यातील केळीला फटका (Hit the banana) बसला आहे. जून महिन्यात तीनदा झालेल्या वादळाने केळी बागा भुईसपाट होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान (Loss of crores of rupees) शेतकऱ्यांचे झाले आहे.
मान्सूनच्या आगमनाने बरसणाऱ्या सऱ्या रावेरात वादळाचा चटका देऊन गेल्या,शनिवारी झालेल्या वादळी पावसाने (torrential rain) पातोंडी व परिसरात केळी बागांची (banana orchards) पुन्हा पडझड झाली आहे.पातोंडी येथील लखन सावळे व स्वप्नील सावळे यांच्या ४५०० खोडांपैकी ३००० हजार खोडे वादळाने जमीनदोस्त झाली आहे,तर अशोक पाटील, हरीश पाटील,डॉ गुलाब पाटिल ,विनोद पाटील , हिम्मतराव पाटील,विजय पाटील,बिजलाल लवंगे, पंकज सपकाळे यांचे देखील मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले आहे.
तर भोर रेल्वेगेट ते नांदूरखेडा रस्ता व पातोंडी रस्त्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पुनखेडा-पातोंडी रस्त्यावर झाडे उन्मळून (Uprooting trees) पडल्याने रहदारी ठप्प झाली आहे.