जळगाव जि.प
जळगाव जि.प

अन् जि.प. पदाधिकार्‍याचा झाला हिरमोड

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा परिषद (Zilla Parishad,), पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) विद्यमान पदाधिकारी, (Office bearers,) सदस्यांचा (members) पाच वर्षांचा कार्यकाळ (Tenure) मार्च 2022 मध्ये संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका (Elections) घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाकडून (Election Commission) मिळाले आहे. त्या अनुषंगाने 30 नोव्हेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग रचना (Format division structure) तयार करण्याचे निर्देश आयोगाने 18 नोव्हेंबरला एका पत्राद्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. दरम्यान, कोरोनामुळे जि.प. व पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढीची मागणी केली होती. मात्र, आता आदेश प्राप्तीनंतर 9 दिवस उलटले. तरीही शासनाकडून मुदतवाढीची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने मुदतवाढीची (extension) आशा (Hope) धूसर (Gray) झाली आहे.त्यामुळे सदस्यांचा हिरमोड (Hirmod) झाला आहे.

जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 15 पंचायत समितीची मुदत सन 2022 मध्ये संपणार आहे. मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक असते. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीची प्रारूप प्रभाग रचना करणे गरजेचे आहे. पाच वर्षांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीवेळी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे मिळून एकूण 122 गण आणि जिल्हा परिषदेचे 67 गट होते. आता नवीन प्रारूप प्रभाग रचनेमुळे गट व गणात बदल होणार आहे.

नशिराबाद-भादली गट बदलणार

यात नशिराबाद-भादली गटातून नशिराबादला नगर पंचायतचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता या गटाची हद्द, क्षेत्र बदल निश्चित केले जाणार आहे. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचना 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने 18 नोव्हेंबर रोजी दिले आहे. अशा स्वरूपाचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागात धडकले आहे. आता प्रारूप प्रभाग रचना करण्याकरिता अवघ्या 4 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. याकरिता सन 2011 ची जनगणना विचारात घेतली जाणार असून, हद्दीत झालेले बदल, क्षेत्र समाविष्ट करणे, वगळणे, विकासांच्या योजनांमुळे झालेले भौगोलिक बदल आदी बाबींचा विचार करावा लागणार आहे. प्रारूप प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर यावर हरकत, आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत देण्यात येईल.

त्यानंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचे अधिकारी विभागीय आयुक्तांना देण्यात आले. अंतिम प्रभाग रचनेनंतर आरक्षण सोडत होईल आणि त्यानंतर खर्‍या अर्थाने निवडणुकीचे पडघम वाजतील. ही प्रक्रिया पूर्ण होण्याकरिता साधारणत: महिन्याभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राजकीय पक्ष एकत्रित लढणार की स्वबळावर?

सध्या जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे. मात्र, सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 33 जागा मिळाल्या होत्या. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस 16, शिवसेना 14 तर काँग्रेस 4 असे एकूण 67 सदस्य प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यावेळी भाजप-शिवसेना युती झाली तर शिवसेनेला उपाध्यक्ष आणि दोन सभापती पद द्यावे लागणार होते.

मात्र,भाजपने शिवसेनेला दूर ठेवून तीन पदे देण्यापेक्षा काँग्रेसचा टेकू घेऊन काँग्रेसचा एक सभापती पद देवून जिल्हा परिषदेवर भाजपने वर्चस्व निर्माण केले होते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर होती. जिल्हा परिषदेत भाजपनेच अडीच अडीच वर्ष पदाधिकार्‍यांनी सत्ता वाटून घेतली.

आता भाजपचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्णत्वाकडे आलेला आहे. भाजपने पाच वर्ष सत्तेची चव घेतली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष एकत्रित लढणार की स्वबळावर याविषयी प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com